IND vs SA 3rd ODI: तिसरा वनडे सामना किती वाजता सुरू होणार? मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहू शकता?

IND vs SA 3rd ODI Final Live: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिका 1-1 बरोबरीत असून निर्णायक सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.
Ind vs Sa 3rd ODI Live Streaming 2025
Ind vs Sa 3rd ODI Live Streaming 2025Pudhari
Published on
Updated on

Ind vs Sa 3rd ODI Live Streaming 2025: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत 4 विकेट्सने बाजी मारली. त्यामुळे मालिकेचा निकाल आता तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये लागणार आहे. हा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये असणार आहे.

सामना किती वाजता सुरू होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा वनडे सामना विशाखापट्टणमच्या वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

  • टॉस होईल : दुपारी 1:00 वाजता

  • सामना सुरू होईल : दुपारी 1:30 वाजता

या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे.

Ind vs Sa 3rd ODI Live Streaming 2025
Ravi Shastri: या दिग्गजांसोबत पंगा घेऊ नका... रवी शास्त्रींनी नाव न घेता दिला 'गंभीर' इशारा

मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

  • लाइव्ह प्रसारण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर

  • लाइव्ह स्ट्रीमिंग : जिओ सिनेमा / हॉटस्टार अॅपवर मोफत

क्रिकेट चाहत्यांना स्ट्रीमिंगसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. फक्त जिओ हॉटस्टार अॅप डाऊनलोड करून थेट सामना पाहता येईल.

दुसऱ्या वनडेमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 358 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने 102 धावा तर ऋतुराज गायकवाडने 105 धावा केल्या होत्या. या दोन शतकांमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र, आफ्रिकेच्या एडन मार्क्रमनेही 110 धावांचे शानदार शतक ठोकत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

Ind vs Sa 3rd ODI Live Streaming 2025
RBI MPC Meet 2025: सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज! होम लोन, कार लोनचा EMI झाला कमी; RBIने घेतला मोठा निर्णय

दोन्ही संघांची संभाव्य टीम

भारत

यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, ध्रुव जुरेल, तिलक वर्मा

दक्षिण आफ्रिका

एडन मार्क्रम, रयान रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रीट्झके, टोनी डी जोरजी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जान्सन, कॉर्बिन बॉश, प्रेनेलन सुब्रहन, नंद्रे बर्गर, ओटनील बार्टमॅन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रुबिन हरमन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news