NZ vs IND 2nd ODI: अडचणीत आलेल्या टीम इंडियाला केएल अन् पावसानं वाचवलं... मालिकेत २-० आघाडी, न्यूझीलंडविरूद्ध केला खास विक्रम

India Vs New Zealand: पावसाच्या व्यत्यायमुळं सामना रद्द करून निकाल डीएलएस मेथडनुसार देण्यात आला.
NZ vs IND 2nd ODI
NZ vs IND 2nd ODIpudhari
Published on: 
Updated on: 

NZ vs IND 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना भारताने ४ धावांनी (DLS Method) जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे १३५ धावांचे आव्हान पार करताना भारताने ७ बाद ११३ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पावसाच्या व्यत्यायमुळं सामना रद्द करून निकाल डीएलएस मेथडनुसार देण्यात आला. विशेष म्हणजे या विजयासोबत भारताने न्यूझीलंड विरूद्ध एक खास विक्रम देखील नोंदवला आहे. ४७

NZ vs IND 2nd ODI
Gurnoor Brar NZ vs IND: गुरनूर ब्रारवर वेस्ट इंडीजचा माजी खेळाडू भलताच खुश.... BCCI ला दिला खास सल्ला

ब्रारचा धमाका मात्र भारताचा डावही घसरला

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर गुरनूर ब्रारच्या ४ विकेट्स अन् आकिब नबी, अंशुल काम्बोज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव १३४ धावात संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या जोरावरच न्यूझीलंड १३४ धावांपर्यंत पोहचले.

मात्र किवींचे १३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला देखील ठराविक अंतराने झटके बसत गेले. भारताची अवस्था ४ बाद ४७ धावा अशी झाली होती. मात्र श्रेयस अय्यरच्या ३० धावा आणि केएल राहुलच्या नाबाद २७ धावांच्या जोरावर भारत विजयाच्या दिशेने कूच करत होती.

NZ vs IND 2nd ODI
Virat Kohli Breaks Ricky Ponting Record: दुसर्‍या वनडेत 'फ्‍लॉप शो' तरीही विराट कोहलीकडून रिकी पाँटिंगचा विक्रम मोडित!

केएलची शेवटपर्यंत झुंज

तरी देखील सामना हा समान स्थिती होता. ज्यावेळी पाऊस आला आणि सामना थांबला त्यावेळी भारताच्या ७ बाद ११३ धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी २२ धावांची गरज होती अन् केएल राहुल आकिब नबी क्रीजवर होते. तर न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ३ विकेट्स घेणे गरजेचे होते.

पावसाने आपला काही खेळ थांबवला नाही अखेर डीएलएस नियमानुसार भारताचा ४ धावांनी विजय झाला.

NZ vs IND 2nd ODI
IND Vs NZ Live Streaming: आता महागडे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही... इथे पाहा फ्रीमध्ये भारत - न्यूझीलंड वनडे मालिका

कोणता खास विक्रम केला?

भारताने न्यूझीलंड विरूद्धचा दुसरा वनडे सामना जिंकून एक खास विक्रम केला आहे. भारताने न्यूझीलंडला आतापर्यंत सर्वाधिक पराभवाचे धक्के दिले आहेत. न्यूझीलंडला एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिकवेळा पराभूत करण्याचा मान भारताला मिळाला आहे.

भारताने २०२६ मध्ये न्यूझीलंडला तब्बल ११ वेळा पराभूत केलं आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २००५ च्या कॅलेंडर वर्षात १० वेळा पराभव केला होता. तर २००८ मध्ये इंग्लंडने ९ वेळा पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.