IND vs IRE 2nd T20 : वैभव सूर्यवंशीच्‍या पदरी पुन्हा निराशा! प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगेला संधी

वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगे यांना संधी
IND vs IRE 2nd T20
IND vs IRE 2nd T20 Pudhari
Published on
Updated on

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज खेळवला जाणार आहे. बेलफास्ट येथे खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव आणि अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगे यांना या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पदार्पणाची संधी दिली आहे. दरम्यान, वैभव सूर्यवंशीची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली आहे. त्याला आता आपल्या पदार्पणासाठी इंग्लंड मालिकेची वाट पाहावी लागणार आहे.

मालिका बरोबरीत सोडवण्‍याच्‍या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदातान

भारतीय संघ रविवारी ही दोन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. श्रेयस अय्यरचे तब्बल ९६० हून अधिक दिवसांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले असून, त्याचे कर्णधारपदावरील पदार्पण तितकेसे चांगले राहिले नाही. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आयर्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

IND vs IRE 2nd T20
Vaibhav Sooryavanshi IND A vs SL A : वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका! लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक

मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात भारताचा झाला होता ३४ धावांनी पराभव

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. कोणत्याही फॉरमॅटमध्ये आयर्लंडचा भारतावरील हा पहिलाच विजय ठरला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रचंड निराशा केली होती. संजू सॅमसन, ईशान किशन आणि स्वतः कर्णधार अय्यर यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नव्हती.

IND vs IRE 2nd T20
Team India : वैभव सुर्यवंशी-अभिषेक शर्मा देणार सलामी.. तिलक 3ऱ्या नंबरवर! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील T20 प्लेईंग 11

वैभवला आता इंग्‍लंड मालिकेची वाट पाहावी लागणार

एका पराभवानंतर संघ व्यवस्थापन घाईघाईने कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. असे असले तरी, युवा खळबळ वैभव सूर्यवंशीला आज आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील होते. मात्र या सामन्‍यात त्‍याला संधी देण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा त्‍याच्‍या पदरी निराशा पडली आहे. त्याला आता आपल्या पदार्पणासाठी इंग्लंड मालिकेची वाट पाहावी लागणार आहे.

भारतीय संघ : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), इशान किशन, श्रेयस अय्यर (क), टिळक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव

आयर्लंड संघ : टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (डब्ल्यू/सी), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news