

ind vs eng test seris ravindra jadeja may be dropped
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्ले लीड्स येथे खेळला जाईल. या कसोटी मालिकेत टीम इंडियाकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विनसारखे महान खेळाडू नसतील. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत सारख्या अनुभवी खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल.
या सगळ्यामध्ये, भारतीय संघात असा एक खेळाडू देखील आहे ज्याच्यासाठी इंग्लंड दौरा शेवटची संधी ठरू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण कोणत्या खेळाडूबद्दल बोलत आहोत. तो खेळाडू म्हणजे स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा.
अलीकडच्या काळात रवींद्र जडेजाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही. गेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 22.81 च्या सरासरीने फक्त 365 धावा केल्या आहेत. या काळात तो फक्त दोन अर्धशतके करू शकला आहे. त्याचा स्ट्राईक रेट 48.15 आहे. तथापि, त्याचे गोलंदाजीचे आकडे निश्चितच चांगले आहेत. तिथे त्याने 10 सामन्यांच्या 16 डावात 36 बळी घेतले आहेत. त्यापैकी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 16 बळी घेतले.
गोलंदाजीत तो भारतीय खेळपट्ट्यांवर बळी घेण्यास सक्षम आहे, पण विदेशात तो बळी घेण्यासाठी त्याला झगडावे लागते. अशा परिस्थितीत, जर जड्डूला कसोटी आपले स्थान टीकवायचे असेल तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चेंडू आणि फलंदाजी दोन्हीने चांगली कामगिरी करावी लागेल.
जर भविष्यात खराब कामगिरीचे मापदंड लावून जडेजाला भारतीय संघातून वगळण्यात आले तर त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू म्हणून कोणाला संघात समाविष्ट केले जाईल असा प्रश्न आतापासून सतावत आहे. पण जडेजानंतरची दुसरीफळी तयार होत आहे. यात अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर सारखे अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. संधी मिळाल्यावर या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत, जर जडेजा इंग्लंड मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तर त्याच्या जागी अक्षर किंवा सुंदर यापैकी एका खेळाडूला स्थान मिळू शकते.