Yashasvi Jaiswal ICC Rankings : यशस्वी जैस्वालची पुन्हा टॉप 5 मध्ये झेप! क्रमवारीतील ‘या’ दोन खेळाडूंना फटका

इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
Yashasvi Jaiswal ICC Rankings : यशस्वी जैस्वालची पुन्हा टॉप 5 मध्ये झेप! क्रमवारीतील ‘या’ दोन खेळाडूंना फटका
Published on
Updated on

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच समाप्त झाली आहे. मालिका संपताच, एका बाजूला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला, तर दुसऱ्या बाजूला आयसीसीने नवीन क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. तसे पाहता, या वेळेस फलंदाजांच्या अव्वल १० क्रमवारीमध्ये फारसे मोठे बदल झालेले दिसत नाहीत, मात्र भारताच्या यशस्वी जैस्वालने निश्चितच लक्षणीय प्रगती केली आहे.

रूट अजूनही नंबर एक कसोटी फलंदाज

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीनुसार, इंग्लंडचा जो रूट अजूनही जगातील नंबर एक कसोटी फलंदाज म्हणून कायम आहे. त्याचे सध्याचे रेटिंग ९०८ इतके आहे. यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकचे वर्चस्व आहे, त्याचे रेटिंग ८६८ इतके आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८५० रेटिंगसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८१६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर कायम आहे. या खेळाडूंच्या क्रमवारीत सध्या तरी कोणताही बदल दिसून आलेला नाही.

Yashasvi Jaiswal ICC Rankings : यशस्वी जैस्वालची पुन्हा टॉप 5 मध्ये झेप! क्रमवारीतील ‘या’ दोन खेळाडूंना फटका
Cape Verde FIFA World Cup : अवघ्या 6 लाख लोकसंख्येचा ‌‘केप व्हर्डे‌’ देश फिफा विश्वचषकासाठी पात्र!

जैस्वालची दोन स्थानांची झेप

या दरम्यान, भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेतली आहे. दोन स्थानांची प्रगती करत तो आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जैस्वालचे सध्याचे रेटिंग ७९१ इतके झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जैस्वालने शतक झळकावले होते. यानंतर, त्याच्या रेटिंगमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. तथापि, दुसऱ्या डावात त्याची बॅट फारशी चालली नाही. आयसीसीने जाहीर केलेली ही क्रमवारी १२ ऑक्टोबरपर्यंतच्या कामगिरीवर आधारित आहे.

Yashasvi Jaiswal ICC Rankings : यशस्वी जैस्वालची पुन्हा टॉप 5 मध्ये झेप! क्रमवारीतील ‘या’ दोन खेळाडूंना फटका
Ravindra Jadeja Big Rocord : विंडिजविरुद्धच्या दुस-या कसोटीनंतर जडेजाची तेंडुलकर आणि सेहवागशी बरोबरी

टेम्बा बावुमा आणि कामेन्दु मेंडिसला फटका

यशस्वी जैस्वालच्या या प्रगतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा आणि श्रीलंकेचा कामेन्दु मेंडिस यांची प्रत्येकी एक-एक स्थानाने घसरण झाली आहे. बावुमा आता ७९० रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर गेला आहे, तर मेंडिस ७८१ रेटिंगसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा ऋषभ पंत पूर्वीप्रमाणेच आठव्या क्रमांकावर कायम आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल नवव्या आणि इंग्लंडचा बेन डकेट दहाव्या क्रमांकावर आहेत.

Yashasvi Jaiswal ICC Rankings : यशस्वी जैस्वालची पुन्हा टॉप 5 मध्ये झेप! क्रमवारीतील ‘या’ दोन खेळाडूंना फटका
Gambhir's big statement on Gill : गिलच्या नेतृत्वावरून गंभीर यांचे मोठे विधान, म्हणाले; ‘कर्णधार बनवून त्याच्यावर उपकार...’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news