ICC Rankings : आयसीसी क्रमवारीत पुन्हा उलथापालथ! यशस्वी जैस्वालला मोठे नुकसान, तर ऋषभ पंतची मोठी झेप

ICCने कसोटी क्रमवारी पुन्हा एकदा जाहीर केली असून यामध्ये अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत.
icc rankings shuffle yashasvi jaiswal slips rishabh pant makes big gain
Published on
Updated on

icc rankings shuffle yashasvi jaiswal slips rishabh pant makes big gain

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. याही वेळी क्रमवारीत मोठी उलथापालथ आणि बदल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, इंग्लंडच्या जो रूटने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. यशस्वी जैस्वालला या वेळी मोठे नुकसान सोसावे लागले आहे, तर दुसरीकडे ऋषभ पंतने एका स्थानाने झेप घेतली आहे. शुभमन गिलला मात्र फारसा फायदा झालेला नाही.

जो रूट ICC कसोटी क्रमवारीत अव्वल फलंदाज

आयसीसीकडून नुकतीच नवीन कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट 904 रेटिंगसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या त्याचे रेटिंग 867 आहे. इंग्लंडचाच हॅरी ब्रूक 834 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी कायम आहे, तर स्टीव्ह स्मिथ 816 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

icc rankings shuffle yashasvi jaiswal slips rishabh pant makes big gain
KL Rahul vs Sachin Tendulkar : केएल राहुल 24 धावा करताच तेंडुलकरला मागे टाकणार! ‘केनिंग्टन ओव्हल’ कसोटीत सुवर्णसंधी

पंतला एका स्थानाचा फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बावुमाने मागील काही काळात एकही सामना खेळलेला नाही, तरीही त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 790 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसलाही एका स्थानाचा फायदा झाला असून, तो 781 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर गेला आहे. भारताच्या ऋषभ पंतने एका स्थानाची झेप घेतली आहे. तो आता 776 रेटिंग गुणांसह सातव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.

icc rankings shuffle yashasvi jaiswal slips rishabh pant makes big gain
Gautam Gambhir Fights : ‘आम्ही काय करायचं, हे तुम्ही सांगू नका!’, ओव्हल मैदानावर गंभीरची सटकली, क्युरेटरवर भडकला

जैस्वालची एकाच वेळी तीन स्थानांनी घसरण

दरम्यान, भारताच्या यशस्वी जैस्वालला मोठे नुकसान झाले आहे. त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून, तो थेट आठव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग आता 769 आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल नवव्या क्रमांकावर कायम आहे आणि त्याचे रेटिंग 754 आहे. चौथ्या कसोटीत अप्रतिम खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या बेन डकेटला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. तो 743 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे, हे त्याच्यासाठी एका मोठ्या कामगिरीपेक्षा कमी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news