

team india coach gautam gambhir fights with oval pitch curator video viral
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील वातावरण अंतिम सामन्यापूर्वीच तापले आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर सरावादरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मैदानाचा क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने खळबळ उडाली. खेळपट्टीची पाहणी करण्यावरून झालेल्या या वादानंतर गंभीरने क्युरेटरला सुनावल्याचे चित्र भारतीय माध्यमांनी टिपले आहे.
ही घटना मालिकेतील निर्णायक पाचव्या कसोटीच्या दोन दिवस आधी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक मैदानातील खेळपट्टीची पाहणी करत असताना क्युरेटरने त्यांना विशिष्ट अंतरावर उभे राहण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. भारतीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीर अत्यंत संतप्त दिसत असून, तो क्युरेटरकडे बोट दाखवून, आम्ही काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही! असे ओरडून सांगताना दिसून आले.
प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांच्या एका कर्मचार्याने आम्हाला अडीच मीटर दूर उभे राहण्यास सांगितले. हे थोडे विचित्र आणि अपमानकारक वाटले.
यापूर्वी ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ कसोटी लवकर संपवण्यावरून दोन्ही संघांमध्ये वाद झाला होता. आता या नव्या वादामुळे मालिकेतील तणाव आणखी वाढला आहे. सध्या इंग्लंड मालिकेत 2-1 ने पुढे असून, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा विजेता इंग्लंड ठरणार की भारत मालिकेत बरोबरी प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार, याचा निर्णय ओव्हल कसोटीवर अवलंबून आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या घटनेमुळे सामन्याआधीच दोन्ही संघांमधील संघर्ष मैदानाबाहेरही शिगेला पोहोचणे साहजिकच ठरते आहे.