Rohit Sharma : रोहित शर्माला मोठा धक्का! अव्वल स्थान गमावले, 'या' धुरंधर फलंदाजाने पहिल्यांदाच मारली बाजी

ICC Rankings : आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत मोठा बदल
icc odi rankings rohit sharma suffers major blow loses top spot daryl mitchell
Published on
Updated on

icc odi rankings rohit sharma suffers major blow loses top spot

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)च्या वनडे फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा मोठे फेरबदल झाले आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून नंबर एकचा मुकुट हिरावला गेला आहे. आता न्यूझीलंडच्या एका जबरदस्त फलंदाजाने या सर्वोच्च स्थानावर पहिल्यांदाच कब्जा केला आहे.

डेरिल मिचेल ठरला जगातील नंबर वन

न्यूझीलंडचा दमदार फलंदाज डेरिल मिचेल (Daryl Mitchell) हा आता आयसीसीच्या वनडे क्रमवारीत जगातील नंबर एकचा फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मिचेलने शानदार शतक ठोकले.

icc odi rankings rohit sharma suffers major blow loses top spot daryl mitchell
Shubman Gill : शुभमन गिल गुवाहाटी कसोटीत खेळणार? BCCIने दिले उत्तर

या खेळीच्या जोरावर मिचेलने थेट दोन स्थानांची झेप घेतली आणि थेट अव्वल स्थान गाठले. त्याने या सामन्यात धडाकेबाज ११९ धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे त्याचे रेटिंग वाढून ७८२ झाले. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मिचेलने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले आहे.

रोहित शर्माची घसरण, पण स्पर्धा कायम

या बदलामुळे रोहित शर्माला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. त्याची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. हिटमॅनचे रेटिंग ७८१ आहे. नंबर एकचा फलंदाज मिचेल आणि रोहित यांच्या रेटिंगमध्ये केवळ एका अंकाचा फरक आहे. त्यामुळे पुढील क्रमवारीत पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

icc odi rankings rohit sharma suffers major blow loses top spot daryl mitchell
Spin Bowling crisis | फिरकी गोलंदाजीसाठी धोक्याची घंटा..!

इतर फलंदाजांची स्थिती

या नवीन क्रमवारीत इतर फलंदाजांच्या स्थानांमध्येही चढ-उतार पाहायला मिळाले. इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) एका स्थानाच्या नुकसानीसह ७६४ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल आणि रन मशीन विराट कोहली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कायम आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याला एक स्थानाचा किरकोळ फायदा झाला आहे. तो ६२२ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा श्रेयस अय्यर एका स्थानाच्या फायद्यासह ७०० रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे.

बाबर आझम, इब्राहिम जादरान, शुभमन गिल आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे टाकून डेरिल मिचेलने थेट नंबर एकचा मुकुट मिळवणे हे त्याच्यासाठी आणि न्यूझीलंड क्रिकेटसाठी मोठे यश आहे. पुढील क्रमवारी मिचेल आणि रोहित यांच्यात एक अंकाच्या फरकामुळे अतिशय चुरशीची होणार हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news