BCCI On Shubman Gill injury
नवी दिल्ली : भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी गुवाहाटी येथे होणार आहे. कोलकाता कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. यामुळे तो दुसर्या डावास मुकला होता. त्यामुळे तो गुवाहाटी येथे होणार्या कसोटी सामन्यात खेळणार का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
कोलकाता येथे पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना गिलला मानेला दुखापत झाली होती आणि त्याला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज (दि.१९) स्पष्ट केले की, कर्णधार शुभमन गिल उर्वरित संघासोबत गुवाहाटीला प्रवास करेल. कोलकाता कसोटीत मानेला झालेल्या दुखापतीनंतर उपचार सुरू असून, तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्याला कोलकाताहून गुवाहाटीला विमानाने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याला मानेला दुखापत झाली होती. दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी संघासोबत गुवाहाटीला प्रवास करेल. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवून राहील आणि दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल." दरम्यान, मालिकेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी पराभव केला होता. आता मालिकेचा दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.