IPL Umpires Salary: IPL मध्ये अंपायर्सची तुफान कमाई! एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या सर्व माहिती

IPL Umpires Salary: IPL मध्ये अंपायर्सना प्रति सामना लाखोंमध्ये मानधन मिळतं, जे T20I पेक्षा खूप जास्त आहे. ऑन-फिल्ड अंपायर्सना सुमारे 3 लाख, तर एलीट अंपायर्सना 3.7 लाख रुपये मिळतात.
IPL Umpires Salary
IPL Umpires SalaryPudhari
Published on
Updated on

IPL Umpires Salary Per Match Fees Bonus: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक पाहिली जाणारी टी20 लीग आहे. खेळाडूंचे कोट्यवधी रुपयांचे पगार आणि बोनस यावर नेहमीच चर्चा होत असली तरी, मैदानातील अंपायर्सच्या कमाईवर क्वचितच चर्चा होते.

अंपायर्स हे क्रिकेटच्या नियमांचे रक्षक असतात आणि लाखो चाहत्यांच त्यांच्या निर्णयांकडे लक्ष असतं. आयपीएलसारख्या स्पर्धेत त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची असते. परिणामी, अंपायर्सना प्रत्येक सामन्यासाठी भरघोस मानधन मिळतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, IPL मध्ये ऑन-फिल्ड अंपायरला प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 3 लाख रुपये मानधन मिळतं. तर थर्ड अंपायर आणि फोर्थ अंपायरला प्रति सामना साधारण 2 लाख रुपये दिले जातात. काही अनुभवी किंवा ICC पॅनलमधील एलीट अंपायर्सना प्रति सामना 3.7 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळू शकतं. याउलट, डेव्हलपमेंट अंपायर्सना प्रति सामना सुमारे 60 हजार रुपये दिले जातात.

IPL Umpires Salary
MS Dhoni Last IPL: CSK च्या चाहत्यांना धक्का! धोनीची ही शेवटची IPL असणार; माजी क्रिकेटपटूने सांगितला रिटायरमेंट प्लॅन

प्लेऑफ आणि फायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये अंपायर्सना अतिरिक्त बोनसही मिळतो. एलीट अंपायर्सना प्लेऑफ सामन्यांसाठी 5 ते 8 लाख रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो, तर फायनलमध्ये ही रक्कम आणखी वाढते. त्यामुळे एका पूर्ण सीझनमध्ये 12 ते 15 सामने अंपायरिंग करणाऱ्या अंपायरची एकूण कमाई साधारण 25 ते 40 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असते.

याशिवाय, अंपायर्सना सीझन रिटेनर म्हणून सुमारे 7.33 लाख रुपये फिक्स रक्कम दिली जाते. त्यासोबत प्रवास, निवास आणि इतर भत्ते वेगळे दिले जातात, ज्यामुळे एकूण उत्पन्न आणखी वाढतं.

IPL Umpires Salary
RCB Sale IPL: कोण खरेदी करणार RCB? दोन कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा; किती कोटींना होणार डील?

विशेष म्हणजे, IPL आणि आंतरराष्ट्रीय टी20 (T20I) सामन्यांमध्ये अंपायर्सच्या फीमध्ये मोठा फरक आहे. T20I सामन्यांमध्ये अंपायर्सना प्रति सामना केवळ 1.13 ते 1.25 लाख रुपये मिळतात, जे IPL मधील 3 लाख रुपयांच्या मानधनाच्या तुलनेत खूपच कमी आहेत. म्हणजेच IPL मध्ये अंपायर्सना T20I पेक्षा जवळपास 2.5 पट अधिक पैसे मिळतात. IPL ही केवळ खेळाडूंसाठीच नव्हे तर अंपायर्ससाठीही कमाईची संधी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news