Hockey World Cup 2026 : हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद

५० वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय ताफा सज्ज
Hockey World Cup 2026 : हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणाऱ्या बहुप्रतिक्षित 'एफआयएच' (FIH) पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. 'हॉकी इंडिया'ने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी २० सदस्यांच्या मजबूत ताफ्याची निवड केली असून, अनुभवी डिफेंडर आणि स्टार ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर मध्यफळीतील अत्यंत अनुभवी शिलेदार मनप्रीत सिंगकडे मिडफिल्डची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल.

गेल्या ५० वर्षांपासून हॉकी विश्वचषकाच्या विजेतेपदाची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीय संघासमोर यंदा नवा इतिहास रचण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भारताने १९७५ मध्ये पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्यानंतर या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची ही सुवर्णसंधी भारतीय संघाकडे चालून आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत सिंगकडून या जागतिक स्पर्धेतही चमकदार कामगिरीची देशवासीयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे, मनप्रीत सिंग आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न करेल.

Hockey World Cup 2026 : हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद
FIFA World Cup 2026 Winner : विश्वचषक विजेत्या फेरान टोरेसचे काय आहे ‘भारताशी कनेक्शन’? जाणून घ्या स्पेनच्या 'गोल्डन बॉय'चा प्रवास

'प्रो लीग'मधील निराशाजनक कामगिरी मागे टाकण्याचे आव्हान

नुकत्याच पार पडलेल्या युरोपियन टप्प्यातील 'एफआयएच प्रो लीग' स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. १६ सामन्यांमध्ये अवघे चार विजय, पाच ड्रॉ आणि सात पराभवांसह भारत ९ संघांच्या तालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र, त्या पराभवांची निराशा मागे सारून विश्वचषकात नव्याने सुरुवात करण्याचा आणि चमकदार कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

प्रो लीगच्या संघात असलेल्या चार खेळाडूंना विश्वचषकाच्या मुख्य ताफ्यात स्थान मिळालेले नाही. यामध्ये डिफेंडर अमनदीप लाकडा, मिडफील्डर राज कुमार पाल, राबीचंद्र सिंह मोइरांगथेम आणि फॉरवर्ड सेल्वम कार्थी यांना संघातून वगळण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी या निवडीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, हा संघ अनुभव आणि युवा उत्साहाचा उत्तम मिलाफ असल्याचे म्हटले आहे. केवळ नावावर नव्हे, तर खेळाडूंच्या अलीकडील कामगिरीच्या जोरावरच त्यांची संघात निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Hockey World Cup 2026 : हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपद
Rohit Sharma Breaks Tendulkar's Record : रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा 'महाविक्रम'

असा आहे भारतीय संघ

संघातील गोलकीपिंगची धुरा मोहित एच. एस. आणि सूरज करकेरा यांच्याकडे असेल. बचावफळीत कर्णधार हरमनप्रीत सिंगसह जरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि यशदीप सिवाच यांचा समावेश आहे. मिडफिल्डची धुरा मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलाकांता शर्मा, राजिंदर सिंग आणि आदित्य अर्जुन लालगे सांभाळतील. तर आक्रमणाची सूत्रे मनदीप सिंह, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग आणि शिलानंद लाकडा यांच्या हाती असणार आहेत.

भारताचा २० सदस्यीय विश्वचषक संघ:

  • गोलकीपर: मोहित एच. एस., सूरज करकेरा.

  • डिफेंडर : जरमनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच.

  • मिडफील्डर : राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद.

  • फॉरवर्ड : दिलप्रीत सिंग, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news