Harshit vs Hardik : हर्षित राणामुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? टीम इंडियाला मिळाला नवा अष्टपैलू पर्याय

कर्णधार गिलने युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचे कौतुक करताना शब्दांची उधळण केली आहे.
Harshit vs Hardik : हर्षित राणामुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? टीम इंडियाला मिळाला नवा अष्टपैलू पर्याय
Published on
Updated on

Harshit Rana all-rounder vs Hardik Pandya position in danger

इंदूर : भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलने युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचे कौतुक करताना शब्दांची उधळण केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील ऐतिहासिक मालिका पराभवानंतर हर्षित राणाची अष्टपैलू कामगिरी भारतीय संघासाठी 'दुखात सुखाची झुळूक' ठरली आहे.

वेगवान गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीचा संगम

भारतीय संघाला गेल्या अनेक दिवसांपासून एका अशा वेगवान गोलंदाजाची प्रतीक्षा होती जो खालच्या क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करू शकेल. २४ वर्षीय हर्षित राणाने या मालिकेत नेमकी हीच उणीव भरून काढली. ‘हर्षितसारखे गोलंदाज दुर्मिळ आहेत, जे १४० किमी प्रतितास वेगाने सातत्याने गोलंदाजी करतात आणि त्यांच्याकडे लाभलेली उंची ही जमेची बाजू आहे. जर त्याने आपल्या फलंदाजीत अशीच सुधारणा सुरू ठेवली, तर तो भविष्यातील एक उत्तम अष्टपैलू खेळाडू ठरेल,’ अशा शब्दांत गिलने त्याचे कौतुक केले.

Harshit vs Hardik : हर्षित राणामुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? टीम इंडियाला मिळाला नवा अष्टपैलू पर्याय
Rohit-Virat : रोहित-विराटच्या कमबॅकची करावी लागणार प्रतिक्षा, हिटमॅन-किंग पुन्हा कधी मैदानात उतरणार? जाणून घ्या तारीख

हार्दिक पंड्या वारंवार दुखापतींनी त्रस्त असताना, हर्षित राणाच्या प्रगतीमुळे भारतीय संघाला एक नवा पर्याय मिळाला आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकासाठी पंड्या आणि राणा हे दोन्ही खेळाडू संघात असणे, हे भारतीय क्रिकेटसाठी एक आदर्श समीकरण ठरेल.

Harshit vs Hardik : हर्षित राणामुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? टीम इंडियाला मिळाला नवा अष्टपैलू पर्याय
T20I Series : टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, २० वर्षीय गोलंदाजाला संधी, दोन दिग्गज खेळाडूंना वगळले

कठीण प्रसंगी झुंजार अर्धशतक

मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली होती. मात्र, आठव्या क्रमांकावर आलेल्या राणाने आपल्या निर्भीड फलंदाजीने सर्वांना चकित केले. त्याने ४३ चेंडूंत ५२ धावांची खेळी करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. त्याने विराट कोहलीसोबत सातव्या विकेटसाठी ९९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राणाच्या खेळीत ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याच्या फलंदाजीत आक्रमकता असली तरी त्यामागे एक अचूक नियोजन पाहायला मिळाले.

गंभीरचा विश्वास सार्थ ठरवला

हर्षित राणाला एका कच्च्या गोलंदाजापासून आक्रमक अष्टपैलू खेळाडू बनवण्यात प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा मोलाचा वाटा आहे. गंभीरने राणाला कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) आणि आता भारतीय संघात जवळून मार्गदर्शन केले आहे. सरावादरम्यान गंभीर तासनतास राणाच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करताना दिसतात, ज्याचा सकारात्मक परिणाम मैदानावरील कामगिरीत दिसून येत आहे. ‘माझ्या संघ व्यवस्थापनाला मी क्रमांक ८ वर एक अष्टपैलू म्हणून खेळावे असे वाटते आणि त्यासाठी मी नेटमध्ये कठोर मेहनत घेत आहे,’ असे राणाने सामन्यानंतर नमूद केले.

Harshit vs Hardik : हर्षित राणामुळे हार्दिक पंड्याचे स्थान धोक्यात? टीम इंडियाला मिळाला नवा अष्टपैलू पर्याय
Sunil Gavaskar : वैभव सूर्यवंशीच्या 'क्रेझ'नंतर गावस्करांचा धोक्याचा इशारा; म्हणाले, ‘कोणालाही लगेच सेन्सेशन म्हणणे घाईचे..’

विराटचे शतक ठरले 'एकाकी' झुंज

दुसरीकडे, भारतीय संघाचा 'चेस मास्टर' विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवली. त्याने १०८ चेंडूंत १२४ धावा फटकावून आपले ५४ वे एकदिवसीय आणि एकूण ८४ वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. विराटने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार लगावत विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ लाभली नाही. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.

विराटने नितीश रेड्डी आणि हर्षित राणा या तरुणांना मार्गदर्शन करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अनुभवाची कमतरता नडल्याने भारताला ३७ वर्षांत पहिल्यांदाच किवींविरुद्ध मायदेशात मालिका गमवावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news