Hardik Pandya Injury : हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर!

पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी आणखी वेळ लागणार
Hardik Pandya Injury
Hardik Pandya InjuryPudhari
Published on
Updated on

Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकने अद्याप गोलंदाजीचा सराव सुरू केलेला नाही. त्याला वनडे क्रिकेटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यास आणखी थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या निवडीसाठी उपलब्ध नाही. दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर ३२ वर्षांचा हार्दिक या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याच्या अगदी जवळ असतानाच हा मोठा धक्का बसला आहे.

IPLमध्ये खेळताना हार्दिकला झाली होती दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी हार्दिक पांड्या आवश्यक फिटनेस पातळी गाठण्यात अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना हार्दिकच्या पाठीचे स्नायू दुखावले गेले होते.

Hardik Pandya Injury
Ishan Kishan : "वनडे वर्ल्ड कपमध्ये..." इशान किशनच्या १२५ धावांच्या खेळीनंतर सुनील गावस्करांचे मोठे विधान!

नवीन दुखापतीमुळे पुनरागमनाला धक्का

दुखापतीतून सावरताना त्याने अलीकडेच बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या (BCCI) 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये तंदुरुस्तीची चाचणी दिली होती. सरावादरम्यान त्याने १० षटकांचा कोटाही पूर्ण केला होता, ज्यामुळे त्याच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान या ऑलराउंडरला आणखी एक झटका बसला. या महिन्याच्या सुरुवातीला क्वाड्रिसेप्सच्या (मांडीचे स्नायू) नवीन दुखापतीमुळे हार्दिकला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही बाहेर व्हावे लागले होते. फिटनेस चाचणीदरम्यान गोलंदाजीचा वर्कलोड वाढल्यामुळेच ही दुखापत झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Hardik Pandya Injury
Ashwin defends Hardik Pandya | 'त्याच्यावरच खापर फोडणे...'; हार्दिक पांड्याबाबत अश्विन नेमकं काय म्‍हणाला?

दुखापतीमुळे आयपीएलमधील अनेक सामन्यांना मुकला

हार्दिकसाठी यंदाचा आयपीएल हंगाम दुखापतींनी भरलेला राहिला. मुंबई इंडियन्सकडून खेळताना दुखापतीमुळे तो अनेक सामन्यांना मुकला होता आणि शेवटच्या काही सामन्यांमध्येच तो संघात परतला होता. आता तो पुन्हा बाहेर झाल्यामुळे निवडकर्त्यांना इंग्लंड मालिकेपूर्वी तातडीने त्याचा बदली खेळाडू शोधावा लागत आहे. हार्दिक वनडेमधील भारतीय संघाचा अत्यंत महत्त्वाचा कणा आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताला अनेकदा योग्य ताळमेळ शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

हार्दिकच्या तंदुरुस्तीकडे BCCIचे लक्ष

२०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणारा वनडे वर्ल्ड कप आता जवळ येत आहे. अशा परिस्थितीत हार्दिकचा वर्कलोड सांभाळत त्याला ५० षटकांच्या क्रिकेटचा अधिकाधिक सराव मिळावा, यासाठी संघ व्यवस्थापन उत्सुक आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही नुकतेच हार्दिकला वनडे क्रिकेटसाठी तंदुरुस्त ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. ते म्हणाले होते की, "हार्दिक सध्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे संघाचा भाग आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच हार्दिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येईल. त्याला वनडे क्रिकेटसाठी तंदुरुस्त ठेवणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असेल."

Hardik Pandya Injury
Shreyas Iyer | टीम इंडिया T-20चा नवा कर्णधार श्रेयस अय्यरचे पहिलेच विधान रोखठोक, "मी कोणाच्याही सावलीत..."

हार्दिकच्या अनुपस्थितीत कोणाला संधी मिळणार?

आता इंग्लंड दौऱ्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडूंचा शोध सुरूच आहे. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी नुकतेच नितीश कुमार रेड्डीचा हार्दिकचा दीर्घकालीन उत्तराधिकारी आणि बॅकअप म्हणून उल्लेख केला आहे. २०२७ च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघ व्यवस्थापन या तरुण खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news