Ashwin defends Hardik Pandya | 'त्याच्यावरच खापर फोडणे...'; हार्दिक पांड्याबाबत अश्विन नेमकं काय म्‍हणाला?

IPLमध्‍ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास अत्यंत निराशाजनक
IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Ravichandran Ashwin on Hardik Pandya

मुंबई इंडियन्सच्या (MI) आयपीएल २०२६ मधील निराशाजनक कामगिरीसाठी केवळ कर्णधार हार्दिक पांड्यालाच जबाबदार धरणे पूर्णपणे अयोग्य आहे, अशा शब्दांत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने हार्दिकची जोरदार पाठराखण केली आहे.

यंदाचा मुंबई इंडियन्‍सचा प्रवास अत्‍यंत निराशाजनक

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास अत्यंत निराशाजनक राहिला. १२ सामन्यांतून केवळ ४ विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा मुंबई हा यंदाच्या हंगामातील दुसरा संघ ठरला. त्यातच हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्हीने चमक दाखवता आलेली नाही. त्याच्या नेतृत्वावर सातत्याने टीका होत आहे.

IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
Mumbai Indians Failure : मुंबई इंडियन्सची दाणादाण; पंड्याचे नेतृत्व की रणनीतीचा अभाव? MI च्या ‘फ्लॉप शो’ची ‘ही’ आहेत 5 कारणे

संपूर्ण खापर कर्णधारावर फोडणे चुकीचे : अश्विन

ESPNcricinfo शी बोलताना अश्विन म्हणाला, "मी यंदाच्या हंगामात त्याच्या नेतृत्वाचे अजिबात पुनरावलोकन करणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचे तर, जेव्हा तुमचा असा खराब हंगाम जातो, तेव्हा त्याचे संपूर्ण खापर कर्णधारावर फोडणे चुकीचे आहे. केवळ तोच नाही, तर संपूर्ण संघच यंदा फ्लॉप ठरला आहे."

IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
IPL 2026 | "तुझं रोहित शर्मासोबत काही बिनसलंय का?" 'हिटमॅन'कडे दुर्लक्ष केल्याच्या प्रश्नावर आर. अश्विनने दिले मजेशीर उत्तर

'तुम्ही त्याच्याकडून फार जास्त अपेक्षा ठेवत आहात'

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर बोलताना अश्विनने गुजरात टायटन्सच्या (GT) यशाचा दाखला दिला. हार्दिकने गुजरातला पहिल्याच हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते आणि दुसऱ्या हंगामात संघ उपविजेता ठरला होता. तो गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. तिथे त्याचे दोन हंगाम उत्कृष्ट राहिले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एक कर्णधार म्हणून त्याने तिथे काहीतरी नक्कीच चांगले केले होते."

IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
Hardik Pandya | "हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही"; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे हार्दिकसाठी कधीच सोपे नव्हते

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे हार्दिकसाठी कधीच सोपे नव्हते, असेही अश्विनने मान्य केले. "रोहित शर्मासारख्या भारताच्या सध्याच्या मर्यादित षटकांच्या कर्णधाराची जागा घेणे सोपे काम नाही. ज्याच्या नावावर आयपीएलची ५ विजेतेपदे आणि टी२० विश्वचषक आहे, त्याची जागा घेणे कठीणच आहे. देशात त्याची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. आजकाल सोशल मीडियावरील टीकेला तोंड देण्यासाठी तुमची क्षमता असावी लागते.

IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
Jasprit Bumrah IPL 2026 |बुमराहच्या यॉर्करची ‘धार’ कुठे हरवली? वर्ल्ड कप गाजवल्यानंतर IPLमध्ये का ठरतोय हतबल?

हार्दिकच्या बॅटिंग फॉर्मबद्दल चिंता

हार्दिकच्या फलंदाजीवर बोलताना अश्विनने त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली. हार्दिक चेंडू खेळताना उशिरा (Late) खेळत असून, यामागे काही शारीरिक दुखापत असण्याची शक्यता त्याने वर्तवली. त्याच्या फलंदाजीत मला एक गोष्ट खूप विचित्र आणि रंजक जाणवली, ती म्हणजे तो चेंडू खूप उशिरा खेळत आहे. त्याला काही शारीरिक त्रास होत आहे का? हे आपल्याला ठाऊक नाही. पण 'हार्ड लेंथ'वर येणाऱ्या चेंडूंना खेळताना तो थकत असल्याचे दिसतोय. दरम्‍यान, हार्दिक पांड्याने यंदाच्या हंगामात ८ डावांत केवळ १४६ धावा केल्या आहेत, तर ११.९० च्या महागड्या इकॉनॉमी रेटने फक्त ४ विकेट्स घेतल्या आहेत. पाठीच्या त्रासामुळे तो यंदाचे तीन सामने खेळू शकला नाही.

IPL 2026 Ravichandran Ashwin on Hardik Pandya
Ayush Mhatre: CSK ला मोठा धक्का! दुखापतीमुळे आयुष म्हात्रे IPL मधून बाहेर; आत 'या' खेळाडूची एन्ट्री होणार

हार्दिक हा 'वन्स-इन-अ-जनरेशन'

हार्दिक हा संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असल्याचे अश्विनने आवर्जून सांगितले. "हार्दिक हा 'वन्स-इन-अ-जनरेशन' (पिढीतून एकदाच मिळणारा) खेळाडू आहे. असे खेळाडू सहजासहजी मिळत नाहीत. भारतीय संघ जर आज टी२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असेल, तर हार्दिक त्याचा मुख्य कणा आहे," असे अश्विनने स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news