Gautam Gambhir: 'ही फक्त देवाची योजना नव्हती...', विश्वविजयानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया

India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction: भारतीय संघाला विश्वविजेते बनवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction
India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reactionGautam Gambhir instagram
Published on
Updated on

India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction

अहमदाबाद: क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही देशाला तीनवेळा टी-२० विश्वचषक जिंकता आलेला नव्हता. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाला विश्वविजेते बनवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीरने या विजयाचे श्रेय संपूर्ण देशाला दिले आहे. गंभीरने सोशल मीडियावर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘सौभाग्यपूर्ण’ असे कॅप्शन दिले आहे. मैदानावर गंभीर चेहऱ्याने वावरणाऱ्या गंभीरचा हा कौटुंबिक आणि आनंदी अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction
MS Dhoni: भारताच्या विजयानंतर धोनीची गौतम गंभीरसाठी खास पोस्ट; बुमराहचंही केलं कौतुक

"ही फक्त देवाची योजना नव्हती..."

विजयाचा जल्लोष साजरा करताना गंभीरने पोस्टमध्ये लिहिले की, "ही फक्त देवाची योजना नव्हती, तर १.४ अब्ज भारतीयांची योजना होती. प्रत्येक खेळाडू एक जागतिक विजेता आहे."

६ महिन्यांत दुसरे जेतेपद

प्रशिक्षक म्हणून गंभीरवर सुरुवातीला अनेक स्तरातून टीका झाली होती. विशेषतः कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अवघ्या ६ महिन्यांत दुसरे मोठे जेतेपद पटकावून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी भारताने गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आशिया चषकावर नाव कोरले होते. सध्या वन-डे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघ जगातील सर्वात शक्तिशाली संघ आहे.

India T20 World Cup 2026 win Gautam Gambhir coach reaction
Mitchell Santner: पराभवानंतरही न्यूझीलंडच्या कर्णधाराने जिंकली मने! पाहा, भारतीय संघाबद्दल तो काय म्हणाला?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news