Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell: इतिहास तुझ्या बाबतीत.. गौतम गंभीरच्या अगरकरला 'मनमोहन सिंग' स्टाईल शुभेच्छा

हिस्ट्री विल काईंडर टू यू... असं म्हणतं गौती भाईने डिअर अजितला दिला निरोप
Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell
Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewellpudhari
Published on: 
Updated on: 

Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell: भारताचा निवडसमिती अध्यक्ष अजित अगरकरचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्याने मुतवाढ नाकारल्यामुळे आता तो पदमुक्त झाला आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अजित आगरकरच्या फेअरवेलसाठी एक खास पोस्ट केली आहे. मात्र ही पोस्ट दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्टाईलमध्ये केल्याने सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला आहे.

Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell
Gautam Gambhir: 811 धावा, गिलचं द्विशतक अन् भारताचा ऐतिहासिक विजय; तरी गंभीर नाराज, म्हणाला, 'हे क्रिकेट नाही, फक्त...'

इतिहास तुझ्याबाबतीत..

गौतम गंभीरने अजित आगरकरसाठी एक्स अकाऊंटवरून पोस्ट केली. तो लिहितो की, 'डिअर अजित भाई, तुझ्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान होता. त्या ३ आयसीसी ट्रॉफी या तुझ्या दृढ निश्चयाची साक्ष देतात. संघ प्रथम आणि कायम संघच सर्वात पुढे... मला म्हणावं लागेल की इतिहास तुझ्याबाबतीत दयाळूपणा दाखवले. सर्व गोष्टींसाठी आभारी आहे. तुला तुझ्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.'

Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell
Ajit Agarkar: BCCI मध्ये मोठी उलथापालथ होणार; रोहित शर्मा वादामुळे आगरकर OUT? VVS लक्ष्मणची एन्ट्री होणार?

२०२३ मध्ये पदभार स्विकारला

अजित आगकरची निवडसमिती अध्यक्ष पदाची कारकीर्द मंगळवारी संपुष्टात आली. बीसीसीआयने आता या पदासाठी अर्ज मागवले आहेत. अजित आगरकरना जुलै २०२३ मध्ये निवडसमिती अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला होता. त्याचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला. त्याने १८ सप्टेंबरच्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत आपणाला मुदतवाढ नको आहे असं स्पष्ट केलं होतं.

Gautam Gambhir On Ajit Agarkar Farewell
Ajit Agarkar's Contract Revises : अजित आगरकरांना BCCI कडून बक्षीस! 2026 पर्यंत निवड समिती अध्यक्षपदी मुदतवाढ

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या

आगरकरच्या कार्यकाळात भारताने २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली. २०२४ मध्ये टी २० वर्ल्डकप आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर २०२६ च्या टी २० वर्ल्डकपर देखील विजयी मोहर उमटवली.

गंभीर आणि आगरकर यांनी एकत्र काम केल आहे. गंभीर कोच म्हणून तर आगरकर निवडसमिती अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांनी एखाद्या व्यक्तीला नाही तर संघाला जास्त महत्व दिलं आहे. त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले ज्यावरून अजित आगरकरवर टीका देखील झाली.

logo
Pudhari News
pudhari.news