Vaibhav Sooryavanshi: टीम इंडियाने वैभव सूर्यवंशीला वाया घालवलं... संजू बेभरवशाचा! माजी निवडसमिती अध्यक्ष थेटच बोलले

वैभवला इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. नंतर त्याला बेंचवरच बसवलं.
Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshipudhari
Published on: 
Updated on: 

vaibhav sooryavanshi India Vs West Indies 4th T20I: वैभव सूर्यवंशीला वेस्ट इंडीजविरूद्धच्या टी २० मालिकेत आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. प्रत्येक सामन्यापूर्वी आता वैभवचा समावेश होणार अशी चर्चा सुरूअसते. मात्र ज्यावेळी प्लेईंग ११ जाहीर होते त्यावेळी वैभवसकट सर्वांची निराशा होते.

चौथ्या टी २० सामन्यावेळी देखील तसेच झाले आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीरने प्लेईंग ११ मध्ये वैभव ऐवजी संजू सॅमसनला संधी दिली. भारताने चौथा टी २० सामना गमावला. त्याचबरोबर मालिका खिशात घालण्याची संधी देखील दवडली. त्यानंतर आता भारताचे माजी कर्णधार आणि माजी निवडसमिती अध्यक्ष के श्रीकांत यांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. त्यांनी टीम इंडियाने वैभव सूर्यवंशीला वाया घालवलं असे वक्तव्य केलं.

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi Post: दोन शब्द, दोन इमोजी... सतत बेंचवर बसवल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सूचक पोस्ट व्हायरल

वैभवला पूर्णपणे वाया घालवलं

वैभवला इंग्लंड दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याला दोन सामन्यानंतर बेंचवर बसवण्यात आलं. झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याला पूर्ण मालिका खेळण्याची संधी मिळाली होती. तिथं तो प्लेअर ऑफ द सीरिज झाला होता. मात्र अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत पुन्हा त्याला बेंचवर बसवण्यात आलं. आता विंडीजसोबत ५ पैकी ४ सामन्यात तो बेंचवरच होता.

यावरून के श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब व्हिडिओत सांगितलं की, 'टीम इंडियाने सूर्यवंशीला पूर्णपणे वाया घालवलं आहे. त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत ३ सामने खेळण्याची संधी देता आली असती. अभिषेक शर्मा दीर्घ काळापासून खेळत आहे. त्याला आराम देता आला असता अन् सूर्यवंशीला सॅमसनसोबत सलामीला पाठवता आलं असतं.'

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi Controversy: टीम इंडियात हुकूमशाही... वैभव सूर्यवंशीच्या कोचचे संघ व्यवस्थापनावर 'गंभीर' आरोप

संजू बाबत साशंकता

श्रीकांत पुढे म्हणाले की, 'सॅमसन कायम वर खाली होत राहिला आहे. त्याच्या खेळीतील सातत्याबाबत कायम साशंकता राहिली आहे. तो अचानक वर्ल्डकपसारखा चमत्कार करेल आणि पुन्हा फेल होईल. अभिषेक शर्मा सारखी कामगिरी कोणी करत नाहीये. पुन्हा सॅमसन पुढच्या सामन्यात धावा करेल.'

Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi : "क्या यार ये व्हाइस कॅप्टन?"; स्लेजिंगच्या जाळ्यात अडकला वैभव सूर्यवंशी; ६ रन्सने हुकले अर्धशतक!

चौथ्या सामन्यात काय झालं?

चौथ्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला २४ धावांनी पराभव सहन करावा लागला. विंडीजचा कर्मधार शे होपने नाबाद १०२ धावांची धडाकेबाज खेळी केली. विंडीजने २४८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर किमो पॉलने ४१ धावात ५ विकेट घेऊन भारताला २२३ धावातच रोखले. भारताकडून संजू सॅमसनने २३ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४३ आणि नितीश कुमार रेड्डीने ४१ धावा करत झुंज दिली. मात्र इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्याने भारताला २४८ धावांचे टार्गेट गाठता आले नाही.

आता मालिकेतील शेवटचा सामना हा शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात तरी वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळते का ते पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news