Vaibhav Sooryavanshi : "क्या यार ये व्हाइस कॅप्टन?"; स्लेजिंगच्या जाळ्यात अडकला वैभव सूर्यवंशी; ६ रन्सने हुकले अर्धशतक!

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वैभवच्‍या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा १५ वर्षीय युवा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी याने आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy : चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाचा १५ वर्षीय युवा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी याने आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, डावाच्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्र्यात दिसलेला वैभव अवघ्या ४४ धावांवर आपली विकेट गमावून बसला. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने केलेल्या स्लेजिंगच्या जाळ्यात अडकून वैभवने विकेट गमावली.

वैभव आणि अभिमन्यूची १०० धावांची भागीदारी

नाणेफेक जिंकून पूर्व विभागाचा कर्णधार इशान किशनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १०० धावांची खणखणीत भागीदारी रचली.

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीची 'विक्रमी' घोडदौड सुरूच; दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मोडला सर्वकालीन विक्रम

सिराजची केली धुलाई!

वैभवने भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्‍या वेगाची दहशत झुगारली. डावाच्या सुरुवातीलाच त्याने सिराजच्या एकाच षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकत त्याला बॅकफूटवर ढकलले. तिलक वर्माच्या बचावात्मक क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेत वैभवने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. परिणामी, सिराजला गोलंदाजीतून हटवावे लागले.

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy
Vaibhav Sooryavanshi : दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची निराशाजनक सुरुवात; अवघ्या ६ चेंडूंत तंबूत परतला

"क्या यार ये व्हाइस कॅप्टन?"...

धावांची गती रोखण्यासाठी कर्णधार तिलक वर्माने स्वतः रणनीती आखली. स्टंप माईकमध्ये तिलकचे शब्द स्पष्ट ऐकू आले; तो वैभवला चिडवत म्हणाला, "क्या यार ये व्हाइस कॅप्टन?" (काय यार, हा कसला उपकर्णधार?). अर्थात, दोन्ही खेळाडूंमध्ये हे खेळकर वातावरणात घडले असले, तरी त्याचा परिणाम वैभवच्या एकाग्रतेवर झाला. चाम मिलिंदच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात वैभव ४४ धावांवर झेलबाद झाला. उपांत्य फेरीतही मध्य विभागाविरुद्ध ९२ धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते, तर आता अंतिम सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या ६ धावांनी हुकले.

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy
Vaibhav Sooryavanshi Debut : अखेर प्रतीक्षा संपली! वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला

ईश्वरनचे शानदार अर्धशतक

दुसऱ्या बाजूने अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरनने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत वैभवच्या आधी आपले अर्धशतक पूर्ण केले. आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड झालेल्या वैभवने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली असली, तरी मोक्याच्या क्षणी विकेट फेकून देण्याची त्याची सवय त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. या सामन्यासाठी पूर्व विभागाने अंतिम ११ खेळाडूंमध्ये एक बदल केला, तर दक्षिण विभागात मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांच्या पुनरागमनासह चार मोठे बदल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news