IPL History's Highest Run Chase |पंजाबने IPLमध्‍ये रचला नवा इतिहास; दिल्लीचा धुव्वा उडवत आतापर्यंतचा सर्वात मोठा 'रन चेस'

DC vs PBKS : पंजाबच्‍या संघाने स्वतःचाच विक्रम मोडला, केएल राहुलची राहुलच्या नाबाद १५२ धावांची खेळी व्‍यर्थ
IPL History's Highest Run Chase
२६५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली.pudhari
Published on
Updated on

IPL History's Highest Run Chase

पंजाब किंग्सने आज (दि.25) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग (रन चेस) करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.दिल्ली कॅपिटल्सने के.एल. राहुलच्या नाबाद १५२ धावांच्या जोरावर २० षटकांत २ बाद २६४ धावांचा डोंगर उभा केला होता. या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पंजाबने १८.५ षटकांत ४ बाद २६५ धावा करत ऐतिहासिक विजय साकारला.

पंजाबने स्वतःचाच विक्रम मोडला

आयपीएल इतिहासातील हे सर्वात मोठे 'रन चेस' ठरले आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम यापूर्वीही पंजाब किंग्सच्याच नावावर होता. २०२४ मध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. आता स्वतःचाच विक्रम मोडीत काढत पंजाबने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे.

IPL History's Highest Run Chase
Abhishek Sharma : अभिषेक शर्माकडून मोहम्मद शमीची धुऽ धुऽ धुलाई..! अवघ्या 12 चेंडूंत ठोकले झंझावाती अर्धशतक
IPL History's Highest Run Chase
Ravichandran Ashwin star culture | "हा काय हेरगिरीचा प्रकार..." : क्रिकेटमधील 'स्टार कल्चर'वर अश्‍विन नेमकं काय म्‍हणाला?

IPL मध्ये १५०+ धावा करणारा राहुल ठरला पहिला भारतीय फलंदाज

दिल्ली संघाचा खेळाडू केएल राहुलने शानदार नाबाद शतक झळकावले. त्याने या सामन्यात १५२ धावांची ऐतिहासिक खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता, ज्याने गेल्या हंगामात पंजाबविरुद्ध १४१ धावांची खेळी केली होती.दिल्लीकडून नीतीश राणाने ९१ धावांचे योगदान दिले. राहुल आणि राणा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची विक्रमी भागीदारी झाली.

IPL History's Highest Run Chase
IPL History and Records : सर्वाधिक विजय मिळवणारे टॉप-५ संघ; पाहा कोण आहे 'नंबर १'

श्रेयसची ७१ धावांची नाबाद खेळी

२६५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रभसिमरन सिंह यांनी अर्धशतके झळकावली. प्रभसिमरन सिंहने अवघ्या २६ चेंडूत ७६ धावांची दमदार खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ७१ धावांची नाबाद खेळी केली. तसेच य प्रियांश आर्याने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

IPL History's Highest Run Chase
IPL History and Records : सर्वाधिक 'मेडन ओवर्स' टाकणारे टॉप-५ गोलंदाज; बुमराह अजून खूप मागे

पंजाबनची पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी

प्रभसिमरन आणि प्रियांश यांच्यात पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी झाली. दिल्लीच्या कुलदीप यादवने २ बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि विप्रज निगम यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.

IPL History's Highest Run Chase
IPL पूर्वी KKR ची डोकेदुखी वाढली; बदली खेळाडूच्या शोधात संघाने ३ वेगवान गोलंदाजांना आजमावले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news