Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराकडून ऑल-टाइम टॉप-५ भारतीय कसोटी वेगवान गोलंदाजांची निवड; मोहम्मद शमीला डच्चू!

पुजाराने नुकतीच 'वर्ल्ड टेस्ट इलेव्हन' निवडली होती, ज्याची जोरदार झाली होती चर्चा
Cheteshwar Pujara Top-5 Indian Test Pacers
Cheteshwar Pujara Top-5 Indian Test Pacers Pudhari
Published on
Updated on

Cheteshwar Pujara Top-5 Indian Test Pacers

भारतीय संघाचा माजी फलंदाज चेतेश्वर पुजारा निवृत्तीनंतर आता नव्या भूमिकेत दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेद्वारे त्याने कसोटी समालोचनात (कमेंट्री) पदार्पण केले आहे. पुजाराने नुकतीच 'वर्ल्ड टेस्ट इलेव्हन' निवडली होती, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. आता पुजाराने ऑल-टाइम टॉप-५ भारतीय कसोटी वेगवान गोलंदाजांची यादी जाहीर केली असून, यामध्ये स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान दिलेले नाही.

मोहम्मद शमीला वगळल्याने आश्चर्य

'क्रिकइन्फो'ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये पुजाराने ही यादी जाहीर केली. ६४ कसोटी सामन्यांत २२९ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असला, तरी निवडकर्ते सध्या युवा गोलंदाजांवर भर देत आहेत. शमी कसोटीत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा सहावा गोलंदाज आहे.

Cheteshwar Pujara Top-5 Indian Test Pacers
ICC Test Rankings : जसप्रीत बुमराहच्या 'वर्चस्वा'ला धक्का, मिचेल स्टार्क कसोटीचा नवा ‘किंग’!, रवींद्र जडेजा नंबर-१ ऑलराउंडर

पुजाराचे ऑल-टाइम टॉप-५ भारतीय वेगवान गोलंदाज

  • कपिल देव: कसोटीत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे दिग्गज वेगवान गोलंदाज.

  • झहीर खान: ९२ सामन्यांत ३११ बळींसह कसोटीत भारताचा दुसरा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज.

  • ईशांत शर्मा: १०५ कसोटी सामन्यांत ३११ बळी.

  • जवागल श्रीनाथ: ६७ कसोटी सामन्यांत २३६ बळी.

  • जसप्रीत बुमराह: ५२ कसोटी सामन्यांत २३४ बळी.

Cheteshwar Pujara Top-5 Indian Test Pacers
Cricket News : दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी संघात अष्टपैलूचा समावेश! कसोटी मालिकेपूर्वी मोठा बदल

बुमराह सध्या दुखापतीमुळे श्रीलंका मालिकेबाहेर

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करणाऱ्या पुजाराने झहीर खान, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तिघांसोबत अनेक सामने खेळले आहेत. बुमराह सध्या दुखापतीमुळे श्रीलंका मालिकेबाहेर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news