Ben Stokes Nightclub Controversy : नाईटक्लबमधील राडा बेन स्टोक्सला नडला! अ‍ॅटकिन्सनसह कसोटी संघातून थेट डच्चू

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचे नेतृत्त्‍व जो रूट करणार
Ben Stokes Nightclub Controversy
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सPudhari.
Published on
Updated on

Ben Stokes Nightclub Controversy : लंडन मधील नाईटक्लबमध्ये रात्रीच्या संचारबंदीचे (कर्फ्यू) उल्लंघन केल्याप्रकरणी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन यांना न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्‍यान, सूत्रांच्या माहितीनुसार, स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे.

नाईटक्लबमध्ये हाणामारीत दोन्ही खेळाडूंचा सहभाग असल्‍याचा संशय

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील १७ जूनपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्स आणि अष्टपैलू गस अ‍ॅटकिन्सन इंग्लंड संघाचा भाग नसतील, या वृत्ताला 'इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने' (ECB) बुधवारी दुजोरा दिला. लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीतील विजयानंतर लंडनमधील एका नाईटक्लबमध्ये संघाच्या नियमांचे उल्लंघन करून एका हाणामारीत हे दोन्ही खेळाडू सामील असल्याचा संशय असून, सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Ben Stokes Nightclub Controversy
Ben Stokes Night Club Scandal: इंग्लंड क्रिकेटमध्ये अजून एक स्कँडल... नाईट क्लब प्रकरणामुळं बेन स्टोक्सचं कर्णधारपद धोक्यात?

जो रूट करणार इंग्लंडचे नेतृत्व

स्टोक्सच्या अनुपस्थितीत जो रूट इंग्लंडचे नेतृत्व करेल. मार्च २०२२ नंतर तो पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. ECB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर, बेन स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन हे १७ जूनपासून किया ओव्हल येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नसतील."

Ben Stokes Nightclub Controversy
Ben Stokes Video Viral: बेन स्टोक्स पुन्हा वादात! नाईटक्लबबाहेर झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल; ECBने सुरू केली चौकशी

स्टोक्सला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता

ब्रिटिश माध्यमांमधील काही वृत्तांनुसार, स्टोक्सला कसोटी कर्णधारपदावरून हटवले जाण्याची दाट शक्यता आहे. तर काही वृत्तांमध्ये तो कसोटी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्याला मुकलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर संघात परतला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळल्यानंतर, आर्चरच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा (कामाचा ताण) विचार करून त्याला लॉर्ड्सवरील पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

Ben Stokes Nightclub Controversy
Sai Sudharsan: चौकार मारला आणि... साई सुदर्शन पुन्हा हिट-विकेट! IPL मध्ये नकोसा विक्रम नावावर; रवी शास्त्रींची भन्नाट कमेंट

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ

जो रूट (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सॉनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, मॅथ्यू फिशर, एमिलियो गे, जेम्स र्यू, ऑली रॉबिन्सन, जेमी स्मिथ, जोश टंग.

स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांच्‍यावर आरोप काय?

लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर ११५ धावांनी विजय मिळवल्यानंतर, सोमवार ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सामन्यांनंतरच्या पत्रकार परिषदेत स्टोक्सने पत्रकारांना सांगितले होते की, तो "मित्रांसोबत बियर पार्टी" करण्यासाठी उत्सुक आहे. पण हा आनंदोत्सव ड्रेसिंग रूमपुरता मर्यादित राहिला नाही. स्थानिक माध्यमांच्या मते, स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन दोघेही चेल्सी येथील 'रेक्स रूम्स' नाईटक्लबमध्ये गेले होते, जिथे सॅरासेन्स (Saracens) रग्बी क्लबचे खेळाडू त्यांच्या सत्राच्या समाप्तीची पार्टी साजरी करत होते.'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, सॅरासेन्स रग्बी संघाच्या एका खेळाडूने अ‍ॅटकिन्सनवर मुक्का उगारला, पण तो इंग्लंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला लागला. या वादविवादापेक्षा मोठी अडचण ही होती की, ही घटना घडली तेव्हा ते तिथे काय करत होते? गेल्या हिवाळ्यात न्यूझीलंड आणि अ‍ॅशेस मालिकेदरम्यान झालेल्या काही घटनांनंतर इंग्लंडच्या खेळाडूंसाठी रात्री १२ वाजेची कठोर संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली होती. स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन यांनी याच नियमाचे उल्लंघन केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news