Ben Stokes Video Viral: बेन स्टोक्स पुन्हा वादात! नाईटक्लबबाहेर झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल; ECBने सुरू केली चौकशी

Ben Stokes Fight Video Viral: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स नाईटक्लबबाहेर झालेल्या कथित भांडणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर ECBने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Ben Stokes Fight Video Viral
Ben Stokes Fight Video ViralPudhari
Published on
Updated on

Ben Stokes Fight Video Viral: इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नाईटक्लबबाहेर झालेल्या कथित भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे स्टोक्सच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही माध्यमांमध्ये त्याच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बेन स्टोक्स आणि त्याचा सहकारी खेळाडू गस ॲटकिन्सन नाईटक्लबबाहेर काही व्यक्तींशी वाद घालताना दिसत आहेत. अहवालांनुसार, त्या व्यक्तींमध्ये एक रग्बी खेळाडू आणि त्याचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडिओमध्ये दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्यानंतर धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याचे दिसत आहे. काही वृत्तांनुसार, या झटापटीत अनेक बुक्क्या मारल्या आहेत आणि एक व्यक्ती जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले. मात्र या घटनेबाबत अधिकृतपणे सर्व तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

विजयाच्या जल्लोषानंतर वाद

ही घटना रविवारी उशिरा रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच इंग्लंडने लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 115 धावांनी शानदार विजय मिळवला होता.

विजयानंतर संघातील खेळाडू सेलिब्रेशनसाठी नाईटक्लबमध्ये गेले होते. त्यानंतरच हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ben Stokes Fight Video Viral
Arjun Tendulkar Video: 3 विकेट्स आणि 66 धावा! अर्जुन तेंडुलकरचा वानखेडेवर धडाका; 34 चेंडूत सामना संपवला

ECBने सुरू केली चौकशी

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ECBने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. बोर्डाने दिलेल्या निवेदनात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर संघाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जात असल्याचे म्हटले आहे.

तसेच या घटनेशी संबंधित अधिक माहिती गोळा केली जात असून योग्य वेळी पुढील निर्णय घेतला जाईल, असे ECBने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची माहिती क्रिकेट रेग्युलेटरलाही देण्यात आली असल्याचे बोर्डाने सांगितले.

स्टोक्सच्या समर्थनार्थ हार्मिसन

दरम्यान, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याने बेन स्टोक्सची बाजू घेतली आहे. एका मुलाखतीत बोलताना हार्मिसन म्हणाला की, संपूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.

"बेन स्टोक्स एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. संपूर्ण घटना आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच त्यावर मत व्यक्त केले पाहिजे. जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर तो स्वतःही ती मान्य करेल आणि योग्य निर्णय घेईल," असे हार्मिसनने म्हटले.

Ben Stokes Fight Video Viral
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडची ऐतिहासिक खेळी! शतक झळकावत द्रविड-गंभीरच्या खास क्लबमध्ये केली एन्ट्री

चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष

सध्या या प्रकरणात अनेक दावे आणि प्रतिदावे समोर येत असले तरी अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही ठोस निष्कर्ष काढणे कठीण आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून आता ECBच्या चौकशी अहवालाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news