IND vs ENG Test Series : इंग्लंड दौऱ्यासाठी BCCIने केली 35 खेळाडूंची निवड? रोहित शर्माबद्दल मोठी अपडेट, निवडकर्त्यांमध्ये कर्णधारपदासाठी गोंधळ

आयपीएल 2025 संपल्यानंतर टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे.
Team India England Tour 2025
Published on
Updated on

Team India England Tour 2025 Five Matches Test Series

मुंबई : आयपीएल 2025 संपल्यानंतर, टीम इंडिया 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. बोर्डाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आणि त्यापूर्वी भारत 'अ' दौऱ्यासाठी खेळाडूंचा एक गट तयार केल्याचे समजते आहे.

खेळाडूंना लाल चेंडूच्या सराव सत्रांमध्ये सहभागी होण्याचे निर्देश

बीसीसीआयने या मालिकेपूर्वी खेळाडूंचा ताळमेळ साधता यावा यासाठी विशेष योजना आखली आहे. बोर्डाने आयपीएल दरम्यान निवडलेल्या खेळाडूंना नियमितपणे लाल चेंडूच्या सराव सत्रांमध्ये सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. या सराव सत्रांमुळे खेळाडूंना कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि मानसिक तयारीस मदत होईल. या योजनेचा उद्देश आयपीएलच्या वेगवान आणि आक्रमक शैलीतून बाहेर पडून खेळाडूंना कसोटी क्रिकेटच्या गरजांनुसार तयार करणे आहे.

Team India England Tour 2025
Cricket in Asian Games 2026 : ‘एशियन गेम्स’मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा तडका! टीम इंडियाची 2 सुवर्णपदके पक्की

युवा आणि नवोदित खेळाडूंनाही संधी

या 35 खेळाडूंच्या यादीत अनुभवी खेळाडूंसह काही युवा आणि नवोदित खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे संघात नवचैतन्य येईल आणि भविष्यातील कसोटी संघाची बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बीसीसीआयच्या या व्यापक योजनेमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अधिक सज्ज आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल, अशी अपेक्षा आहे.

Team India England Tour 2025
IPL 2028 Matches : 2028च्या IPLमध्ये रंगणार 94 सामने? BCCI घेणार मोठा निर्णय

रोहित शर्मा नेतृत्व करेल

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हिटमॅन फलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. तसेच कांगारूंविरुद्ध दारुण परभवाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरीही, बीसीसीआयला आव्हानात्मक अशा इंग्लंड दौऱ्यासाठी अनुभवी कर्णधाराची आवश्यकता आहे, आणि रोहित हा त्यासाठी योग्य पर्याय मानला जात आहे. ‘इंग्लंडमध्ये मजबूत आणि शांत नेतृत्वाची गरज आहे. यात रोहित ही भूमिका चांगली निभावू शकतो,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Team India England Tour 2025
IPL 2025 मध्ये Mumbai Indians चे ‘चॅम्पियन’ होणे निश्चित... तयार होत आहे ‘हा’ रंजक योगायोग

सुदर्शन, नायर, पाटीदारचे यादीत नाव?

बीसीसीआयने तयार केलेल्या 35 जणांच्या यादीत साई सुदर्शन, करुण नायर आणि रजत पाटीदार यांची नावे असल्याचे समजते आहे. सुदर्शन आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी करत असून, तो रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यानंतर तिसरा सलामीवीर म्हणून दौऱ्यावर जाऊ शकतो. दुसरीकडे, मधल्या फळीतील स्थानासाठी करुण नायर आणि रजत पाटीदार यांचा विचार होत आहे, तर श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

अश्विनच्या निवृत्तीनंतर कुलदीप मुख्य फिरकीपटू

रविचंद्रन अश्विनच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कुलदीप यादव मुख्य फिरकीपटू म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे, तर अक्षर पटेलला यादीत स्थान मिळालेले नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या तंदुरुस्तीबाबत चिंता असल्याने, बीसीसीआयने गोलंदाजी विभाग मजबूत ठेवण्यासाठी अनेक पर्यायी जलद गोलंदाजांचा समावेश केला आहे.

Team India England Tour 2025
IPL Orange Cap Race : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत भारतीय फलंदाजांचा दबदबा! विदेशी फलंदाज पडले फिके

हा दौरा आयपीएल 2025 च्या फायनलनंतर, म्हणजेच 27 मे नंतर सुरू होईल. भारतीय संघ 20 जूनपासून हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना खेळेल. बीसीसीआय मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम संघाची घोषणा करेल, असे सांगण्यात आले आहे.

या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघ 3 चार दिवसीय सामने खेळणार आहे. या सामन्यांद्वारे युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. शिवाय, अंडर-19 राष्ट्रीय संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्यासाठी पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

Team India England Tour 2025
MS Dhoni IPL Retirement : ‘धोनी कशाला खेळतोस.. निवृत्ती घेऊन टाक!’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

हा दौरा भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचा मानला जात आहे, कारण इंग्लंडमधील परिस्थिती आणि ड्यूक्स चेंडूचा सामना करणे संघासाठी आव्हानात्मक असेल. चाहते या दौऱ्यासाठी उत्सुक असून, भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news