Bangladesh WTC India Impact: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय भारताची ठरला डोकेदुखी.... WTC पॉईंट टेबलमध्ये मोठा खड्डा

Bangladesh WTC India Impact
Bangladesh WTC India Impactpudhari
Published on
Updated on

Bangladesh WTC India Impact: बांगलादेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात दिली. या ऐतिहासित विजयानंतर संपूर्ण क्रिकेट जगत अवाक झालं. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला पराभवाची धूळ चारल्यामुळं त्यांचा हा विजय अजूनच खास झाला आहे.

ऑस्ट्रेलिया संघात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, नाथन लायन, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड सारखे स्टार खेळाडू होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या बांगलादेशने पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला होता. आता या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे.

Bangladesh WTC India Impact
Bangladesh vs Australia : क्रिकेट जगतात मोठी उलथापालथ! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत बांगलादेशने भारत-पाकिस्तानचा विक्रमही मोडला

बांगलादेशमुळं भारताला नुकसान

सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया (७७.७७%) पहिल्या स्थानावर विराजमान आहे. ७५ विनिंग पर्सेंटाईल घेऊन गतविजेता दक्षिण अफ्रिका दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंड (७२.२२ टक्के) तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाला मात देणारा बांगलादेश चौथ्या स्थानवर असून त्यांचे विनिंग पर्सेंटाईल हे ६६.६७ टक्के इतकं झालं आहे. तर भारत हा पाचव्या स्थानावर असून भारताचे विनिंग पर्सेंटाईल हे ४८.१५ टक्के इतके आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील विनिंग पर्सेंटाईलचा गॅप हा जवळपास १८ टक्क्यांचा आहे. यामुळं भारताची WTC ची फायनल गाठण्याची आशा किती धुसूर झाला आहे हे दिसून येतं.

Bangladesh WTC India Impact
IND vs SL Test Day 2 : पडिक्कलचे द्विशतक हुकले; जुरेलचे अर्धशतक, टीम इंडियाने ७ गडी गमावत मारली ४६० धावांपर्यंत मजल

जर बांगलादेशने सामना गमावला असता तर..?

जर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला कसोटी सामना गमावला असता तर त्यांचे पॉईंट ४६.६७ पर्यंत घसरले असते. अशा परिस्थितीत भारत चौथ्या स्थानावर गेला असता. आता बांगलादेशच्या विजयामुळं भारत पाचव्या स्थानावरच अडकून पडली आहे.

भारताला जर फायनल खेळायची असेल तर त्यांना टॉप २ मध्ये सामील व्हावं लागेल. यासाठी भारताला आता उरलेल्या ९ कसोटी सामन्यांपैकी ८ सामन्यात विजय मिळवायला हवा. भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून या मालिकेत ते दोन कसोटी सामने खेळणार आहेत.

Bangladesh WTC India Impact
ICC WTC Points Table : ऑस्‍ट्रेलियामध्‍ये बांगलादेशचा विजय ! WTCच्या शर्यतीत रंगत; टीम इंडियाची स्थिती काय?

भारताचं पुढचं शेड्युल

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध त्यांच्यात मायभूमत देखील दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड WTC टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत ५ सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका भारत मायदेशात खेळणार आहे. भारताला पुढचे सात सामने हे अशा संघांसोबत खेळायचे आहेत जे संघ पॉईंट टेबलमध्ये टॉप ३ मध्ये आहेत. त्यामुळं भारताचा फायनलचा रस्ता कठीण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news