Bangladesh vs Australia : क्रिकेट जगतात मोठी उलथापालथ! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत बांगलादेशने भारत-पाकिस्तानचा विक्रमही मोडला

ऑस्ट्रेलियन भूमीवर बांगलादेशचा पहिला कसोटी विजय

Bangladesh Historic Test Win In Australia
Bangladesh Historic Test Win In Australia Photo ICC X
Published on
Updated on

Bangladesh Historic Test Win In Australia : बांगलादेश संघाने रविवारी पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तब्बल ९ गडी राखून पराभव करत नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बांगलादेशचा हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१७ मध्ये मीरपूर कसोटीत बांगलादेशने कांगारूंना २० धावांनी मात दिली होती.

कसोटी सामन्‍यात चौथ्या दिवशी विजय

सामन्याच्या चौथ्या दिवशी डार्विनच्या मारारा क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे किरकोळ आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने १४.२ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.


Bangladesh Historic Test Win In Australia
IND vs SL 1st Test Day 1 : देवदत्त पडिक्कलचे दमदार शतक; पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थिती

सामन्‍यात काय घडलं?

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८४ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने १०४ धावांची शतकी खेळी केली, तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ६६ धावा देत ५ बळी टिपले.तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांत गुंडाळण्यात बांगलादेशला यश आले होते. त्यात हसन महमूदने ६ बळी घेतले होते. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने पहिल्या डावात ४२६ धावांचा डोंगर उभारून तब्बल २२८ धावांची भक्कम आघाडी घेतली. याच भक्कम आघाडीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला.

ऑस्ट्रेलियाच्‍या भूमीवर सर्वात वेगवान विजय मिळवणारी आशियाई टीम

ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात जलद कसोटी विजय नोंदवणारा बांगलादेश आता पहिला आशियाई संघ बनला आहे. बांगलादेशने अवघ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातच ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद केली. याउलट, भारताला ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला विजय मिळवण्यासाठी १२ कसोटी सामने वाट पाहावी लागली होती, तर पाकिस्तानने ७ व्या कसोटीत विजयाचे खाते खोलले होते. श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियात १५ कसोटी सामने खेळले असले, तरी त्यांना अजूनही तेथे एकाही विजयाची नोंद करता आलेली नाही.


Bangladesh Historic Test Win In Australia
India vs Bangladesh cricket : 'आम्ही स्वतः निर्णय घेऊ शकत नाही': बांगलादेश दौऱ्यासाठी BCCI केंद्राकडे मागणार परवानगी!

घरच्या मैदानावर ऑस्‍ट्रेलिया संघाचा नामुष्‍कीजनक पराभव

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने गेल्या ३१ वर्षांत घरच्या मैदानावर भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध कसोटी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, 'SENA' (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये बांगलादेशचा हा दुसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी २०२२ मध्ये माउंट माउंगानुई येथे बांगलादेशने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

भारत आणि पाकिस्तानचा मोठा विक्रमही मोडीत

ऑस्ट्रेलियात गड्यांच्या (Wickets) आधाराने सर्वात मोठा विजय मिळवणारा बांगलादेश आता आशियातील अव्वल संघ ठरला आहे. या बाबतीत बांगलादेशने भारत आणि पाकिस्तानचा विक्रमही मोडीत काढला आहे. भारतीय क्रिकेट संघाटने २०२० मध्ये मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून नमवले होते. तर पाकिस्‍तानच्‍या संघाने १९७७ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशचा गड्यांच्या फरकाने हा दुसरा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. यापूर्वी २०२४ मध्ये रावलपिंडी येथे बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता.


Bangladesh Historic Test Win In Australia
Ajit Agarkar: BCCI मध्ये मोठी उलथापालथ होणार; रोहित शर्मा वादामुळे आगरकर OUT? VVS लक्ष्मणची एन्ट्री होणार?

दुसरा सामना २२ ऑगस्टपासून

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना २२ ऑगस्टपासून मॅके येथे खेळवला जाईल. या नामुष्‍कीजनक पराभवानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल करण्याचा दबाव निवड समितीवर असेल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ चा भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news