ICC WTC Points Table : ऑस्‍ट्रेलियामध्‍ये बांगलादेशचा विजय ! WTCच्या शर्यतीत रंगत; टीम इंडियाची स्थिती काय?

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्‍यावर बांगलादेशचे संपूर्ण वर्चस्‍व
ICC WTC Points Table
बांगलादेश संघाने ऑस्‍ट्रेलियामध्‍ये मिळवलेला कसोटी सामन्‍यातील विजय ऐतिहासिक ठरला आहे. ICC x
Published on
Updated on

ICC WTC Points Table : क्रिकेट चाहत्‍यांनी कल्‍पनाही केली नव्‍हती, अशी कामगिरी बांगलादेशच्‍या संघाने केली आहे. या संघाने ऑस्‍ट्रेलियामध्‍ये मिळवलेला कसोटी सामन्‍यातील विजय ऐतिहासिक ठरला आहे. डार्विनच्या मरारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा तब्बल ९ विकेट्सने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियन भूमीवर बांगलादेशचा हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.

कसोटी सामन्‍यावर बांगलादेशचे संपूर्ण वर्चस्‍व

बांगलादेशने हा विजय संपूर्ण वर्चस्व गाजवत मिळवला. सुमारे साडेतीन दिवस चाललेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ एकदाही बांगलादेशवर वरचढ ठरताना दिसला नाही. यजमान ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात अवघ्या १९८ धावांत गारद झाला. यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात ४२६ धावांचा विशाल डोंगर उभारून २२८ धावांची भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ २५४ धावाच करू शकला, ज्यामुळे बांगलादेशला विजयासाठी ५७ धावांचे सोपे आव्हान मिळाले. हे आव्हान बांगलादेशने अवघा १ गडी गमावून सहज पार केले.

ICC WTC Points Table
Nalasopara Cake Food Poisoning : नालासोपाऱ्यात केकमध्ये आढळली पाल; ७ चिमुकल्यांसह ११ जणांना विषबाधा

गुणतालिकेत बांगलादेशची मोठी झेप

या दणदणीत विजयामुळे बांगलादेशने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये कमालीचे यश मिळवले आहे. बांगलादेशचा संघ आता थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचा विजयाचा टक्का (PCT) ५८.३३ वरून थेट ६६.६७ वर गेला आहे.

ICC WTC Points Table
Pan Masala ad Controversy : शाहरुख खान, अजय देवगणसह टायगर श्रॉफला तुकाराम मुंडेंची नोटीस, नेमकं कारण काय?

ऑस्‍ट्रेलियाच अव्‍वल स्‍थानी

दुसरीकडे, या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या अव्वल स्थानाला तूर्तास धक्का बसलेला नाही. चालू डब्ल्यूटीसी चक्रातील ऑस्ट्रेलियाचा हा केवळ दुसराच पराभव आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या ७७.७७ टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर कायम असला, तरी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी (७५ टक्के) त्यांच्यातील फरक आता अत्यंत कमी झाला आहे.

Pudhari

टीम इंडियाची स्थिती काय?

गुणतालिकेत ७२.२२ टक्क्यांसह न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे, तर चौथ्या स्थानावर आता बांगलादेशने कब्जा केला आहे. भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर घसरला असून, त्यांच्यानंतर श्रीलंकेचा संघ आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ सध्या गॉल येथे पहिला कसोटी सामना खेळत असून दोघांचेही लक्ष WTC फायनलवर आहे. भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित ९ कसोटी सामन्यांपैकी किमान ७ सामन्यांमध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे. या यादीत इंग्लंड सातव्या आणि पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news