West Indies vs Australia : अंपायरही चक्रावले! T-20 विश्वचषकात पडला सर्वात 'अजब' नो बॉल; व्हिडिओ तुफान व्हायरल!

वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन महिला संघाची आठव्यांदा फायनलमध्ये धडक
West Indies vs Australia WT20WC 2026 :
West Indies vs Australia WT20WC 2026 :Pudhari
Published on
Updated on

West Indies vs Australia WT20WC 2026 : क्रिकेटच्या मैदान म्‍हटलं की अनपेक्षित घटनांची मालिका. येथे कधी काय घडेल याचा नेम नाही. धावचीत, झेलबाद किंवा नो बॉलचे अनेक प्रकार आपण आजवर पाहिले असतील; पण महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये असा काही 'नो बॉल' पडला आहे, याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात घडलेल्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

मैदानावर नेमकं काय घडलं ?

मंगळवारी 'इंग्लंड ओव्हल'वर ऑस्‍ट्रेलिया आणि वेस्‍ट इंडिज महिला संघात सेमीफायनलचा सामना झाला. यावेळी वेस्‍ट इंडिजच्‍या गोलंदाजाने नेहमीप्रमाणे धावत येत चेंडू टाकला. फलंदाजानेही त्यावर सुरेख फटका मारला. मात्र, चेंडू टाकण्याच्या नादात गोलंदाजाचा पाय नॉन-स्ट्रायकर (गोलंदाजाच्या बाजूच्या) एंडला असलेल्या स्टॅम्प्सना धडकला. वेग जास्त असल्याने यष्ट्यांवरील बेल्स खाली पडल्या. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार, चेंडू टाकताना किंवा फॉलो-थ्रूमध्ये गोलंदाजाचा कोणताही अवयव यष्ट्यांना लागून बेल्स पडल्यास तो 'नो बॉल' घोषित केला जातो. पंचांनी तात्काळ याला 'नो बॉल' ठरवले.

West Indies vs Australia WT20WC 2026 :
IND vs PAK T20 WC LIVE : भारताचा 64 धावांनी धमाकेदार विजय, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; दिप्ती शर्माने घेतल्या 5 विकेट

आयसीसीचा व्हिडिओ व्हायरल; कमेंटचा पाऊस!

"असे रोज पाहायला मिळत नाही..." आयसीसीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या अजब नो बॉलचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर क्रिकेट जगतात नियमांवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीच्या या नियमाचे समर्थन केले असून, गोलंदाजाच्या शिस्तीसाठी हा नियम योग्य असल्याचे म्हटले आहे.दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी मात्र या नियमाची जोरदार खिल्ली उडवली आहे. "फलंदाजाला बाद करण्याऐवजी गोलंदाज स्वतःच्याच यष्ट्या उडवतोय," अशा कमेंट्स शेअर केले आहेत.

West Indies vs Australia WT20WC 2026 :
Team India U19 World Champion : युवा टीम इंडिया विश्व चॅम्पियन! ठोकला जेतेपदाचा ‘विक्रमी षटकार’

सामन्‍यात काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजची सुरुवात सावध पण संथ झाली. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४७ धावा केल्‍या. त्यानंतर विकेट्स पडण्याचे सत्र सुरू झाले. बिनबाद ४७ वरून संघ ५९ धावांवर ४ बाद अशा अडचणीत सापडला. ८३ धावांत संघाचे ६ गडी बाद झाले होते. डिएंड्रा डॉटिनने डाव सावरत संघाला ७ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. डॉटिनने २६, कॅम्पबेलने २२ आणि हेली मॅथ्यूजने ३० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार सोफी, ॲशले गार्डनर आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी २-२, तर सदरलँडने १ विकेट घेतली.

West Indies vs Australia WT20WC 2026 :
Cricket Record: २५४ वर्षात कोणालाच जमलं नाही! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने केला भन्नाट विश्वविक्रम; व्हिडिओ पाहाच!

ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज फलंदाजी, आठव्यांदा फायनलमध्ये धडक

१२६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के बसले. २९ धावांवर जॉर्जिया वॅरेहम बाद झाली, त्यानंतर ४३ धावांवर फीबी लिचफील्ड तंबूत परतली. यादरम्यान एलिस पेरी दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्यांना मैदान सोडावे लागले, त्यांनी २ धावा केल्या. जॉर्जियाने १६ आणि लिचफील्डने ४ धावा केल्या.मात्र त्यानंतर विकेटकीपर-बॅटर बेथ मुनीने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. तिने ३६ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावा केल्या. तिला उत्तम साथ देत ॲशले गार्डनरने २० चेंडूत ३५ धावा कुटल्या आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला. या दोघांमध्ये ६३ धावांची निर्णायक भागीदारी झाली. वेस्ट इंडिजकडून हेन्री आणि मॅथ्यूजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news