Asian Games 2026 : कबड्डीमध्ये भारताचा डबल धमाका! महिला संघापाठोपाठ पुरुष संघानेही पटकावले सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डी संघाची नवव्यांदा सुवर्णपदकावर मोहोर
Asian Games 2026 India Kabaddi Gold Medal
Published on: 
Updated on: 

Asian Games 2026 India Kabaddi Gold Medal : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपले ऐतिहासिक वर्चस्व कायम राखत, अंतिम सामन्यात इराणविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत ४०-३४ अशा शानदार विजयासह सुवर्णपदक जिंकले.भारताने कबड्डीमध्ये सुवर्णपदकांची दुहेरी कामगिरी साध्य केली. महिला संघाने इराणचा ३७-३४ असा पराभव केल्यानंतर, पुरुष संघानेही इराण संघाचा ४०-३४ असा पराभव करत रोमांचक अंतिम सामना जिंकला.

पहिल्या हाफमध्‍ये अटीतटीची लढत

भारत आणि इराण यांच्यातील सामना पहिल्या हाफ अत्यंत चुरशीचा झाला. इराणने सुरुवातीला आक्रमक खेळ केला; परंतु भारताने जोरदार पुनरागमन केले. तरीही, भारताला ही लय कायम राखता आली नाही. इराणच्या खेळाडूंनी दबाव वाढवला. या काळात भारताने 'सुपर टॅकल'द्वारे गुण मिळवत आघाडी घेतली. मात्र, भारत ही आघाडी फार काळ टिकवू शकला नाही; इराणने भारताला 'ऑल-आउट' केले आणि त्यातून चार गुण मिळवले. यामुळे इराणला १४-१३ अशी आघाडी मिळाली. 'ऑल-आउट'नंतर भारताने पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला; पण पहिल्या सत्राच्या अखेरीस इराणने १८-१७ अशी निसटती आघाडी घेतली होती.

Asian Games 2026 India Kabaddi Gold Medal
Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची नेमबाजीत कमाल! रौप्यपदकासह तिलोत्तमा-विदार्साची फायनलमध्ये धडक

दुसर्‍या हाफमध्‍ये भारताचे दमदार पुनरागमन

दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर त्यांनी इराणविरुद्ध आक्रमक खेळ केला, इराणच्या संघाला 'ऑल-आउट' करत आघाडी घेतली. सामन्यात १० मिनिटे शिल्लक असताना भारताकडे इराणपेक्षा पाच गुणांची आघाडी होती. भारताच्या या आक्रमक खेळामुळे इराणच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भारताने आपली आघाडी वेगाने वाढवली, खेळातील लय कायम ठेवली. इराणच्‍या संघावर सतत दबाव टाकला. सामन्याच्या अंतिम क्षणांत अस्लमने उत्कृष्ट कामगिरी केली; इराणच्या बचावपटूंनी वेढा घातलेला असतानाही त्याने चातुर्याने 'वॉक लाइन' ओलांडली. यामुळे भारताची इराणवरील आघाडी नऊ गुणांपर्यंत पोहोचली. इराणच्या प्रत्येक आक्रमणाला भारताने चोख प्रत्युत्तर देत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

Asian Games 2026 India Kabaddi Gold Medal
Manu Bhaker Asian Games 2026 : अरेरे! ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरला आशियाई स्पर्धेत पदकाची हुलकावणी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे वर्चस्व

पुरुषांची अंतिम सामन्‍यात एका टप्प्यावर गुणसंख्या २०-२० अशी बरोबरीत होती; परंतु भारताने आघाडी घेत आणखी एक सुवर्णपदक जिंकले. अपवाद २०१८ च्या जकार्ता येथे झालेल्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष संघाने सलग सात सुवर्णपदके जिंकली होती. मात्र जकार्ता येथे झालेल्‍या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत इराण संघाने सुवर्णपदक पटकावले होते. तर भारत चौथ्या स्थानावर राहिला होता. २०२३ च्या हांगझोऊ स्पर्धेत भारताने कबड्डी संघाने पुनरागमन करत पुन्हा एकदा आशियाई स्‍पर्धेत विजेतेपद पटकावले. आता जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत अजिंक्‍यपदा कायम ठेवले. आशियाई स्‍पर्धेत कबड्डीमध्ये भारताच्‍या पुरुष संघाचे हे नववे सुवर्णपदक ठरले आहे.

Asian Games 2026 India Kabaddi Gold Medal
IND W vs SL W Asian Games 2026 : भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत पटकावले सुवर्णपदक

भारताची पदकसंख्या २८ वर

महिला संघानेही इराणवर ३७-३४ अशी मात करून आपले विजेतेपद कायम राखले आणि भारतीय कबड्डीसाठी ही दुहेरी कामगिरी अविस्मरणीय ठरवली. या दोन सुवर्णपदकांमुळे भारताची एकूण पदकांची संख्या २८ वर पोहोचली आहे: यात चार सुवर्ण, ११ रौप्य आणि १३ कांस्यपदकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news