Asian Games 2026 Shooting: अवघ्या 2 मिनिटांत भारताला गोल्ड आणि सिल्व्हर! 5 नेमबाजांची रचला इतिहास, टीम इंडियाची मोठी झेप

Asian Games 2026 Shooting: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026मध्ये भारताने नेमबाजीत शानदार कामगिरी करत अवघ्या दोन मिनिटांत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.
Asian Games 2026 Shooting
Asian Games 2026 ShootingPudhari
Published on: 
Updated on: 

Asian Games 2026 Shooting: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026मध्ये भारताने नेमबाजीत दमदार कामगिरी करत अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरात गोल्ड आणि सिल्व्हर अशी दोन पदके जिंकली आहेत. या शानदार कामगिरीमुळे भारताने पदकतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम प्रकारात कमलजीत आणि सुरुचि सिंह या भारतीय जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीला पराभूत करत अव्वल स्थान पटकावले. या विजयासह भारताला एशियन गेम्स 2026 मधील निशानेबाजीत पहिले सुवर्णपदक मिळाले.

भारतीय खेळाडूंच्या या यशाची चर्चा सुरू असतानाच 50 मीटर रायफल 3 पोझिशन टीम इव्हेंटमध्ये भारताच्या पुरुष संघानेही दमदार कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी शानदार नेमबाजी करत रौप्यपदकाची कमाई केली.

Asian Games 2026 Shooting
Ajit Pawar Ganeshotsav Banner: '...परत पाठवा आमच्या दादाला!', बाप्पाच्या विसर्जनावेळी अजितदादांसाठी भावनिक साद, बॅनरने मन हेलावलं

विशेष म्हणजे, या दोन्ही पदकांमध्ये भारताच्या एकूण पाच नेमबाजांचा महत्त्वाचा वाटा आहे. अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरात भारताच्या खात्यात एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्यपदक जमा झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Asian Games 2026 Shooting
Hiring Controversy: 'या' चार राज्यातील कर्मचाऱ्यांना नोकरी देणार नाही; उद्योजकाचा मोठा निर्णय, सोशल मीडियावर संताप, काय आहे प्रकरण?

या कामगिरीमुळे एशियन गेम्सच्या पदकतालिकेत भारताची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. नेमबाजी पुन्हा एकदा भारतासाठी मोठ्या पदकांची कमाई करणारा क्रीडा प्रकार ठरत असल्याचे या कामगिरीतून दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news