Arshdeep Singh: अर्शदीप सिंह पुन्हा वादात? Snapchat पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्याला दिलेल्या उत्तरावरून वाद

Arshdeep Singh Controversy: पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह Snapchat वरील कथित प्रतिक्रियेमुळे वादात सापडला आहे. पंजाब संघावर टीका करणाऱ्या एका चाहत्याला दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.
Arshdeep Singh Controversy
Arshdeep Singh ControversyPudhari
Published on
Updated on

Arshdeep Singh Controversy: IPL 2026 मध्ये पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या कथित Snapchat प्रतिक्रियेवरून वाद निर्माण झाला असून, सोशल मीडियावर समर्थक आणि टीकाकार अशा दोन गटांत चर्चा रंगली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब किंग्सच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये, “पंजाबचं नाव IPL मधून काढून टाका, तुम्ही आमची बदनामी करत आहात,” अशा आशयाची टीका करण्यात आली होती.

यावर अर्शदीप सिंहने Snapchat वर प्रतिक्रिया दिल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटनुसार, “तुम्ही पंजाबसाठी काय केलं आहे? जे लोक अजूनही घरी चिप्स आणि कोल्ड ड्रिंकसाठी पैसे मागतात, त्यांनी पंजाबबाबत सल्ला देऊ नये,” अशा आशयाचे उत्तर देण्यात आले आहे.

Arshdeep Singh Controversy
Arshdeep Singh ControversyIPL

या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही चाहत्यांनी अर्शदीपची बाजू घेत, क्रिकेटपटूंनाही सतत ट्रोलिंग आणि वैयक्तिक टीकेला सामोरे जावे लागते, असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे, अनेकांनी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूकडून अधिक संयमी वर्तन अपेक्षित असल्याचे म्हटले.

Arshdeep Singh Controversy
LSG vs CSK | चेन्नईचे प्ले-ऑफचे गणित बिघडले!

दरम्यान, सोशल मीडियावर काही युजर्सनी चाहत्यांच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केल्याचा आरोप करत अर्शदीपवर टीका केली आहे. मात्र, या व्हायरल पोस्टबाबत अधिकृत पुष्टी किंवा अर्शदीप सिंहकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

Arshdeep Singh Controversy
icc penalty on pakistan | पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघाला 'दुहेरी' झटका, ICC ने केली मोठी कारवाई

यापूर्वीही अर्शदीप काही सोशल मीडिया वादांमुळे चर्चेत आला होता. त्यामुळे मैदानावरील कामगिरीइतकीच त्याच्या सोशल मीडिया वर्तनाचीही चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, IPL 2026 हंगामात अर्शदीप सिंहची कामगिरी संमिश्र राहिली आहे. त्याने 13 सामन्यांत 12 विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट 9.69 इतका राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news