Arjun Tendulkar IPL debut |'क्रिकेट तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते!' : सचिनने मुलासाठी लिहिली खास आणि भावूक पोस्ट

LSG कडून पदार्पण करत अर्जुन तेंडुलकरने केली लक्षवेधी कामगिरी
Arjun Tendulkar IPL debut
अर्जुन तेंडुलकरने 'लखनऊ सुपर जायंट्स' (LSG) कडून आपल्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. सचिनने खास पोस्‍ट करत त्‍याचे कौतूक केले. Pudhari
Published on
Updated on

Arjun Tendulkar IPL debut

मुंबई : २६ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने 'लखनऊ सुपर जायंट्स' (LSG) कडून आपल्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. यंदाच्‍या हंगामातील लखनऊच्या शेवटच्या सामन्यात अर्जुनने टाकलेल्या उत्कृष्ट स्पेलने वडील सचिन तेंडुलकरचे मन जिंकले. यानंतर सचिनने शनिवारी सोशल मीडियावर पोस्‍ट करत मुलासाठी एक खास आणि भावूक पोस्‍ट केली आहे.

सामन्‍यात अर्जुनने घेतली महत्त्‍वपूर्ण विकेट

शनिवारी, २३ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरने लखनऊ सुपर जायंट्ससाठी पदार्पण केले. इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने आपल्या कोट्यातील संपूर्ण ४ षटके गोलंदाजी केली आणि एका उत्कृष्ट यॉर्करवर प्रभसिमरन सिंगची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

Arjun Tendulkar IPL debut
Vaibhav Suryavanshi IPL 2026 | "त्याला थांबवणे अशक्य!" : वैभव सूर्यवंशीबाबत गावस्करांनी सर्व IPL संघांना कोणता इशारा दिला?

अर्जुनला शेवटच्‍या सामन्‍यापर्यंत संधीची वाट पाहावी लागली

अर्जुनच्या या कामगिरीनंतर वडील सचिन तेंडुलकरने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने अर्जुनच्या कठोर परिश्रमांचे आणि खेळावरील प्रेमाचे कौतुक केले. सामना संपल्यानंतर लगेचच सचिनने सोशल मीडियावर ही भावूक पोस्ट शेअर केली. सचिन सहसा आपल्या मुलाच्या क्रिकेट प्रवासावर जाहीरपणे भाष्य करणे टाळतो. मात्र, चालू हंगामातील साखळी फेरीच्या अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहावी लागूनही, संयम न गमावता पडद्यामागे कठोर परिश्रम घेत राहिल्याबद्दल सचिनने अर्जुनचे कौतुक केले.

Arjun Tendulkar IPL debut
IPL 2026 | 'डिअर क्रिकेट, मला आणखी एक संधी दे' : करुण नायरची 'ती' जुनी पोस्ट का होतीय व्हायरल?

"खूप छान खेळलास अर्जुन!

"खूप छान खेळलास अर्जुन! या संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळलेस, त्याचा मला अभिमान आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, संयम राखणे, शांतपणे कठोर परिश्रम करणे आणि अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहावी लागूनही सकारात्मक राहणे हे कौतुकास्पद आहे. क्रिकेट कौशल्याइतकीच तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते. आज तू या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळल्यास. नेहमीप्रमाणेच पाय जमिनीवर ठेव आणि खेळावर असेच प्रेम करत राहा. माझे तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील," असे सचिनने 'X' पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Arjun Tendulkar IPL debut
IPL 2026 | 'एक परिपक्व कर्णधार कधीही...'; अक्षर पटेलच्या 'त्या' वागण्यावर माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्न!

अर्जुनने दडपणाखाली आपली खरी क्षमता दाखवली

पंजाबच्या आक्रमणाचा धैर्याने सामना करत अर्जुनने अचूक आणि वेगवान यॉर्कर टाकला, ज्यावर प्रभसिमरन सिंग पूर्णपणे चकवा खाऊन एलबीडब्ल्यू (LBW) झाला. ६९ धावांवर खेळणाऱ्या प्रभसिमरनला बाद करत अर्जुनने आपली पहिली आयपीएल विकेट मिळवली. अर्जुनने टाकलेले डावातील १७ वे (आणि स्वतःचे अंतिम) षटकही तितकेच प्रभावी ठरले. डेथ ओव्हर्समध्ये दडपणाखाली गोलंदाजी करताना त्याने केवळ ५ धावा दिल्या. पंजाबने अखेर हे लक्ष्य गाठले असले, तरी अर्जुनने गोलंदाजीवर कमालीचे नियंत्रण दाखवले. त्‍याने ४ षटकांत ३६ धावा देत १ बळी (४-०-३६-१) अशी कामगिरी केली.

Arjun Tendulkar IPL debut
Sunil Gavaskar | 'शतकासाठी स्वार्थी व्हावे लागले असते'; संजू सॅमसनच्या रिॲक्‍शनवर सुनील गावस्‍कर म्‍हणाले, "संयम नेहमीच.."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news