

Argentina Falkland Controversy: अर्जेंटिना फिफा वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० ने पराभूत केलं. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंग पावलं. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाचा संघ अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यातच आता अर्जेंटिनाचे विश्वचषक खेळलेले तीन खेळाडू लिसांद्रो मार्टिनेझ, ख्रिस्तियन रोमेरो आणि अन्झो फर्नांडिस यांचा युनायटेड किंगडमचा व्हिसा मागे घेजला जाण्याची शक्या आहे.
वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्धची सेमी फायनल जिंकल्यानंतर या खेळाडूंनी फाल्कलँडवरून आक्षेपार्ह बॅनर झळकावले होते. त्यानंतर युरोपातील वातावरण ढवळून निघालं असून अनेक राजकीय नेत्यांनी फिफाने अर्जेंटिनावर खेळात राजकारण आणल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
फिफाने या प्रकरणी तपास सुरू असून याबाबत अजून अधिकृत कारवाई करण्यात आलेली नाही असं सांगितलं. मात्र जरी फिफाच्या तावडीतून अर्जेंटिना सुटली तरी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मार्टिनेझ, रोमेरो आणि फर्नांडिस यांना याची शिक्षा भोगावी लागू शकते.
एक्सप्रेस युकेमधील वृत्तानुसार कायदेतज्ज्ञ हे अर्जेंटिनाच्या प्रीमियर लीग खेळाडूंचे व्हिसा रद्द करण्यात येऊ शकतात का याची चाचपणी करत आहेत. त्यामुळं २०२६-२७ च्या प्रीमियर लीग हंगामात या खेळाडूंना त्यांच्या क्लबकडून खेळता येणार नाही.
मार्गारेट थेचरचे माजी सहयोगी नाईल गार्डनर यांनी अर्जेंटिनाच्या तीन खेळाडूंचे व्हिसा रद्द करावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'ब्रिटीश विरोधी कृतीबद्दल इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक अर्जेंटिनाच्या खेळाडूचा युके व्हिसा रद्द कवारा. याबाबत झिरो टॉलरन्सची भूमिका घ्यावी.'
अर्जेंटिनाच्या खेळाडूंबद्दल युकेच्या चाहत्यांनी देखील रोष व्यक्त केला आहे. एक चाहता म्हणतो की, 'ज्या खेळाडूंना या बॅनरबाबत माहिती होते त्या अर्जेंटिनाच्या खेळाडूंना जोपर्यंत ते पूर्णपणे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा व्हिसा रद्द करावा
विशेष म्हणजे अर्जेंटिनाचे वर्ल्डकप संघातील तीन खेळाडू हे इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळतात. मार्टिनेझ हा मँचेस्टर युनायटेडचा डिफेंडर आहे. तर एन्थो फर्नांडिस हा चेल्साकडून खेळतो. तर ख्रिस्तियन रोमेरो हा टोटनहॅमचा डिफेंडर आहे.
हे तिघे फाल्कलँडवर दावा करणारे पोस्टर झळकवण्यात आघाडीवर होते. या बॅनरवर द फाल्कलँड हे बेट अर्जेंटिनाचे आहे असा मजकूर लिहिला होता.
मात्र असं असलं तरी युकेमधील इमिग्रंट एक्सपर्टच्या मते फक्त बॅनर झळकावलं म्हणून युकेचा व्हिसा रद्द करणं अवघड आहे.