Argentina Vs England: माल्विनास (फाल्कलँड) आमचाय... इंग्लंडला लोळवताच अर्जेंटिनानं झळकवलं पोस्टर; नेमका वाद काय?

Falkland Malvinas Dispute
Falkland Malvinas Disputepudhari
Published on
Updated on

Argentina Vs England Falkland Malvinas Dispute: अर्जेंटिनाने पिछाडी भरून काढत इंग्लंडाल २-१ अशी मात देत सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने झुंजार खेळ केला. मात्र सामन्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी एक पोस्टर झळकवलं. यावरून जागतिक राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता यावर फिफा काय कारवाई करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Falkland Malvinas Dispute
FIFA World Cup Semi Final : ९०० बळी, ४४ वर्षांचे शत्रुत्व... इंग्लंड-अर्जेंटिनामध्ये पुन्हा भडकणार ९० मिनिटांचे सूडनाट्य

फिफा स्टेडियम कोड ऑफ कंडक्टनुसार बॅनर्स, फ्लॅग, फ्लेयर्स, अपेरल आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्या राजकीय, वादग्रस्त आणि भेदभाव करणारे असतील ते मैदानाच्या आत घेऊन येण्यास बंदी आहे. मात्र अर्जेंटिनाच्या या कृतीवर फिफाने लगेच प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली आहे.

Falkland Malvinas Dispute
Lionel Messi Controversy: मेस्सी दिसतो तसा नाही, त्याला रेड कार्डच दाखवायला पाहिजे... अल्जेरियाचा स्टार फुटबॉलरवर गंभीर आरोप

फाल्कलँड-माल्विनासचा वाद काय?

दक्षिण अटलांटिक समुद्रातील एक बेट जे ब्रिटीशांच्या दृष्टीकोणातून फाल्कलँड आहे तर अर्जेंटिना त्याला माल्विनास असं म्हणतं. या बेटावरून या दोन्ही देशात अनेक काळापासून कटू संबंध राहिले आहेत.

या बेटावरून १९८२ मध्ये दोन्ही देश युद्ध देखील लढले असून या युद्धात ६४९ अर्जेंटिनाचे आणि २५५ ब्रिटीश सैनिक मृत्यूमुखी पडले होते.

Falkland Malvinas Dispute
Kylian Mbappe FIFA World Cup 2026 records: मेस्सी-रोनाल्डोच्या स्पर्धेत एम्बाप्पेनं 'चान्स' मारला... ठरला नॉकआऊट्सचा बादशाह

ब्रिटनने जिंकलं युद्ध

ब्रिटनने हे युद्ध जिंकलं होतं. त्यानंतर या बेटावर राहणाऱ्या बहुतांश लोकांनी आम्ही ब्रिटनचा भाग राहणार अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र अर्जेंटिना बऱ्याच काळापासून या बेटावर आपला दावा सांगत आहे. १८१६ मध्ये स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अर्जेंटिना या बेटाला आपला भूभाग मानतं मात्र १८३३ मध्ये ब्रिटीश सरकारने अनधिकृत वसाहत अॅक्टद्वारे या बेटावर आपलं नियंत्रण मिळवलं.

Falkland Malvinas Dispute
Lionel Messi Record: मेस्सीने इतिहास रचला! अर्जेंटिनाचं दमदार कमबॅक; 2026 FIFA विश्वचषकात केला मोठा विक्रम

सेमीफायनल नंतर मैदानावर नेमकं काय झालं?

सामन्यानंतर मार्टिनेझ आणि सेल्सो यांनी एक बॅनर ग्राऊंडवर झळकवलं. हे बॅनर त्यांनी चाहत्यांकडे पाहून हसून ते झळकवालं. मात्र हे बॅनर कुठून आलं याबाबत मात्र अजून माहिती समोर आलेली नाही.

फिफा वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच एखादे राजकीय बॅनर झळकवण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यात लॉस एंजल्समध्ये इराणी अमेरिकन्सनी इराणचा दुना झेंडा झळकवला होता. त्यांनी तेहरानमधील सध्याच्या खामेनी सरकारविरूद्ध आपला निषेध नोंदवला होता. हा झेंडा इराण सामना खेळत असताना झळकवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news