Andrew Symonds Death : ‘आयपीएल’च्या पैशामुळे आला हाेता अँड्र्यू सायमंड आणि मायकल क्लार्कच्या मैत्रीत दुरावा

Andrew Symonds Death : ‘आयपीएल’च्या पैशामुळे आला हाेता अँड्र्यू सायमंड आणि मायकल क्लार्कच्या मैत्रीत दुरावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds Death) शनिवारी (दि.१४) रात्री कार अपघातात मृत्यू (Car Accident) झाला. या अपघातामुळे क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या सायमंड्सला आपला जवळचा मित्र माईकल क्लार्क याच्यासोबत बिघडलेल्या नात्याबाबत नेहमीच खंत वाटत राहिली. मैत्री तुटली आणि याचे कारण भांडण नसून आयपीएलमध्ये (IPL) मिळालेला पैसा होता.

मृत्यूच्या काही दिवस आधीच सायमंड्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कवर अनेक गंभीर आरोप केले होते. कर्णधार झाल्यानंतर त्याचा मित्र कसा बदलला आणि जेव्हा त्याला आयपीएलमध्ये अमाप संपत्ती मिळाली तेव्हा हे नातेही तुटल्याचे त्याने सांगितले होते. एकवेळ अशी आली जेव्हा संघाचा हंगामी कर्णधार मायकेल क्लार्कने टीम मीटिंगसोडून मासेमारी करण्यास गेल्यामुळे सायमंड्सला संघातून वगळले होते.

2015 मध्ये अष्टपैलू सायमंड्सने क्लार्कवर जोरदार टीका केली होती. कारण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माईकल क्लार्कने अँड्र्यू सायमंड (Andrew Symonds Death) हा एका एकदिसीय सामन्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत आला होता, असा आरोप केला होता.

सायमंड म्हणाला होता, आयपीएलच्या पहिल्या सत्राच्या लिलावात मला मोठी रक्कम मिळाल्याने क्लार्कला चांगले वाटले नाही. सायमंड म्हणाला, 'जेव्हा क्लार्क संघात आला तेव्हा मी त्याच्यासोबत खूप फलंदाजी करायचो. त्यामुळे मी त्याची पूर्ण काळजी घेतली. यामुळे आम्ही जवळ आलो. जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा मला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप पैसे मिळाले. क्लार्कला हे खटकू लागले आणि तो आमच्या नात्यात दुरावा आला.

सायमंड पुढे म्हणाला, पैसाही खूप गम्मतशीर गोष्ट असते ती खूप काही करते. ही चांगली गोष्ट आहे पण, ते विषदेखील असू शकते आणि मला वाटते की, यामुळे आमच्या नातेसंबंधात विष पसरले. माझी आता त्याच्याशी मैत्री नाही; पण मी इथे बसून चिखलफेक करणार नाही.

आयपीएलच्या पहिल्या सत्रातील लिलावात महेंद्रसिंग धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याच वेळी, स्फोटक अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला हैदराबाद डेक्कन चार्जर्सने १.३५ मिलियन डॉलरमध्ये विकत घेतले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news