Andrew Symonds : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू - पुढारी

Andrew Symonds : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळ हर्वे रेंज रोडवर ४६ वर्षीय महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात मृत्यू  झाला. त्याची कार रस्ता सोडून उलटल्याने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे क्वीन्सलँड पोलिसांनी शनिवारी रात्री सांगितले.

मार्चमध्ये शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या दुःखद मृत्यूनंतर सायमंड्स हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील तिसरे दिग्गज आहेत ज्यांचे या वर्षी अचानक निधन झाले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा आणखी एक तिसरा मोठा धक्का आहे.  सायमंड्सच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट करून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू जेसन नील गिलेस्पी यांनी सायमंड्सच्या मृत्यूच्या वृत्तावर शोक व्यक्त केला. “जागे होताच ही भयानक बातमी आली.  संपूर्णपणे उद्ध्वस्त. आम्ही सर्वजण तुझी आठवण काढणार आहोत मित्रा”, असे गिलेस्पी म्हणाले.

माजी सहकारी आणि फॉक्स क्रिकेट सहकारी एडम गिलख्रिस्टने लिहिले, “हे खरोखर दुःखद आहे.” वरिष्ठ क्रिकेट पत्रकार रॉबर्ट क्रॅडॉक यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री टाऊन्सविलेच्या बाहेर सुमारे ५० किमी अंतरावर ऑसी अष्टपैलू खेळाडूचा मृत्यू झाला. क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायमंड्स रात्री १०.३० वाजता कारने एकटे निघाले होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला. (Andrew Symonds)

अपघाताच्या माहितीनंतर, वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत सायमंड मृत्युमुखी पडले होते. सायमंड्स ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी खेळले आणि १९९९ ते २००७ दरम्यान जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा ते अविभाज्य भाग होते. निवृत्तीनंतर खेळताना, वॉर्न आणि सायमंड्स दोघेही फॉक्स क्रिकेटच्या समालोचन संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य होते.

पहा व्हिडीओ : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती

हे वाचलंत का? 

Back to top button