Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप; तज्ज्ञाच्या विचित्र दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

वैभव सूर्यवंशीच्या तुफानी फलंदाजीमुळे पाकिस्तानातील एका क्रिकेट विश्लेषकाने त्याच्या बॅटमध्ये AI चिप असल्याचा विचित्र दावा केला आहे. IPL 2026 मध्ये वैभवने आक्रमक खेळी करत अनेक विक्रम केले आहेत.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav SuryavanshiPudhari
Published on
Updated on

Vaibhav Suryavanshi AI Chip Bat Controversy: अवघ्या 15 व्या वर्षी जगभरात चर्चेचा विषय ठरलेला युवा भारतीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. IPL 2026 मध्ये त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक गोलंदाजांची झोप उडवली आहे. मात्र, त्याच्या यशामुळे आता विचित्र आरोपांचा सामना त्याला करावा लागत आहे.

पाकिस्तानातील एका क्रिकेट विश्लेषकाने तर थेट वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञ नियाज यांनी ‘स्मॅशहिट’ नावाच्या शोमध्ये बोलताना आश्चर्यजनक विधान केलं. ते म्हणाले, “हा मुलगा नेमका कोण आहे? त्याच्या बॅटची तपासणी झाली पाहिजे. जसं WADA डोपिंग टेस्ट करते, तसचं त्याची बॅट लॅबमध्ये तपासायला हवी. कदाचित त्याने बॅटमध्ये AI चिप बसवली असेल.”

नियाज पुढे म्हणाले की, “हा खेळाडू अविश्वसनीय आहे. एवढ्या कमी वयात तो ज्या प्रकारे शॉट्स खेळतो, ते पाहून धक्का बसतो. त्याच्याकडे अप्रतिम टेक्निक आहे. तो मनगटाचा जबरदस्त वापर करतो आणि मैदानात 360 डिग्रीमध्ये फटके मारतो.”

दरम्यान, वैभव सूर्यवंशीची कामगिरी खरंच थक्क करणारी ठरली आहे. Royal Challengers Bengaluru विरुद्ध त्याने फक्त 26 चेंडूत 78 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तो IPL इतिहासातील सर्वात वेगवान शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र थोडक्यात विक्रम हुकला.

Vaibhav Suryavanshi
Paytm Share Crash: RBIच्या एका निर्णयाने Paytm हादरलं! काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5,800 कोटी रुपये बुडाले

यानंतर काही सामन्यांत त्याला मोठी खेळी करता आली नाही. तरीही त्याने जोरदार पुनरागमन करत Sunrisers Hyderabad विरुद्ध अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Vaibhav Suryavanshi
CSK vs GT | ‘टायटन्स’नी सर केला चेन्नईचा बालेकिल्ला; साई सुदर्शनच्या झंझावातापुढे ‘सीएसके’चे लोटांगण

वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीमुळे क्रिकेट जगतात त्याची तुलना मोठ्या स्टार्ससोबत होऊ लागली आहे. त्याच वेळी त्याच्यावर होणारे असे विचित्र आरोप हे त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचं आणि प्रभावाचं प्रतीक मानलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news