IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया संकटात? वरुण चक्रवर्तीने केला मोठा खुलासा

T20 World Cup 2026: अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. वरुण चक्रवर्तीने त्याच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंट घेणार आहे.
Abhishek Sharma Fitness Update
Abhishek Sharma Fitness UpdatePudhari
Published on
Updated on

Abhishek Sharma Fitness Update: T20 वर्ल्ड कप 2026मध्ये भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही सामन्यांत विजय मिळवत टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानावर आहे. आता 15 फेब्रुवारीला भारताचा सर्वात मोठा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी मात्र चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे सलामीवीर अभिषेक शर्मा खेळणार का?

अभिषेक शर्माला यूएसएविरुद्धच्या सामन्यानंतर पोटाच्या संसर्गामुळ रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे त्याने नामिबियाविरुद्धचा सामना खेळला नाही. त्याच्या प्रकृतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. पाकिस्तानसारख्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याचा फिटनेस हा संघासाठी मोठा चिंतेचा विषय आहे.

दरम्यान, वरुण चक्रवर्तीने अभिषेकच्या प्रकृतीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. त्याने सांगितले की अभिषेकने नामिबिया सामन्यापूर्वी सराव केला होता आणि तो चांगल्या स्थितीत दिसत होता. वरुण म्हणाला की, “माझ्या माहितीनुसार तो ठीक आहे. त्याने सरावही केला आहे. पुढच्या सामन्यात तो खेळेल, अशी मला आशा आहे.” मात्र अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंटवर अवलंबून असल्याचेही त्याने सांगितले.

Abhishek Sharma Fitness Update
इशान किशनचा धमाका! अवघ्या २० चेंडूत ठोकले अर्धशतक; मोडला धोनीचा ऐतिहासिक विक्रम

दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉसच्या वेळी सांगितले होते की, अभिषेकला अजून एक-दोन सामने विश्रांती द्यावी लागू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय सामना जवळ आल्यावरच स्पष्ट होणार आहे. जर अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर पाकिस्तानविरुद्ध तो संघात परतू शकतो.

Abhishek Sharma Fitness Update
Bangladesh Election: बांग्लादेशात 20 वर्षानंतर BNP पक्षाला बहुमत; पंतप्रधान होणारे तारिक रहमान कोण?

भारत-पाकिस्तान सामना केवळ प्रतिष्ठेचा नाही, तर स्पर्धेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतचे दोन सामने जिंकले असून प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकणाऱ्या संघाचे सुपर-8 मध्ये स्थान जवळपास निश्चित होईल.

भारतीय चाहत्यांसाठी आता लक्ष अभिषेकच्या फिटनेस अपडेटकडे लागले आहे. तो मैदानात उतरतो की नाही, हे सामन्यापूर्वीच स्पष्ट होईल. मात्र संघाची लय पाहता, भारत आत्मविश्वासाने पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार हे नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news