Lord Thakur : शार्दुल ठाकूरसमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांचे लोटांगण! | पुढारी

Lord Thakur : शार्दुल ठाकूरसमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांचे लोटांगण!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरने (shardul thakur and lord thakur) आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियासाठी जोरदार पुनरागमन केले आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवशी त्याने यजमान संघाला जोरदार धक्के दिले. पहिल्यांदा त्याने दुसऱ्या विकेटची मजबूत भागीदारी मोडून पहिले यश संपादन केले. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेला आणखी दोन धक्के दिले आणि तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या.

Image

शार्दुलने (shardul thakur and lord thakur) दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिले षटक टाकले. याआधी, सिराजला दुखापत झाल्यानंतर त्याने पहिल्या दिवशी भारताच्या १८ षटकांच्या गोलंदाजीत एक चेंडू टाकला होता. यानंतर, त्याला दुसऱ्या दिवशी १९ षटकांनंतर ३७ व्या षटकात पहिले षटक टाकण्याची संधी मिळाली आणि येथून त्याने दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च फळी उद्ध्वस्त केली. त्याने पहिल्यांदा एल्गर आणि पीटरसन यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी मोडीत काढली. यानंतर अर्धशतक शळकना-या पीटरसनला ६२ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शार्दुल (shardul thakur) इथेच थांबला नाही आणि त्याने पुन्हा आक्रमक गोलंदाजी करून अवघ्या एका धावेवर रासी व्हॅन डर ड्युसेनला तिसरा बळी बनवला.

Image

शार्दुलने (shardul thakur and lord thakur) दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ४.५ षटके टाकली आणि आठ धावांत तीन गडी बाद केले. यामध्ये त्याने दोन मेडन षटकेही टाकली.

शार्दुलच्या कामगिरीवर चाहते फिदा झाले…

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शार्दुलने (shardul thakur and lord thakur) पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी त्याने कमाल केली. त्याच्या अद्भुत कामगिरीने तो सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. ट्विटरवर चाहत्यांनी ‘लॉर्ड शार्दुल’ हा ट्रेंड करत त्याची स्तुती करत कौतुकाचे गोडवे गायले.

Back to top button