Bangladesh Cricket : बांगलादेश टीमने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट ‘रिव्ह्यू’ | पुढारी

Bangladesh Cricket : बांगलादेश टीमने घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट ‘रिव्ह्यू’

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे बांगलादेश (Bangladesh Cricket) आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी शानदार खेळ दाखवत येथे न्यूझीलंडची अवस्था बिघडवली. पण या सामन्यादरम्यान असे काही घडले की खेळाडूंपासून समालोचकांपर्यंत सगळ्यांनीच डोक्याला हात लावला.

वास्तविक तस्किन अहमदने रॉस टेलरला यॉर्कर लेन्थ बॉल टाकला, जो रॉस टेलरच्या पायाजवळ गेला. अंपायरने नॉट आऊट घोषित केले, पण बांगलादेशने (Bangladesh Cricket) रिव्ह्यू घेतला आणि निर्णय थर्ड अंपायरकडे गेला. रिप्ले पाहिला असता चेंडू बॅटच्या मध्यभागी लागल्याचे स्पष्ट दिसले. रिप्ले पाहून समालोचकही हसले आणि म्हणाले की पंचाचा निर्णय पूर्णपणे योग्य होता. गोलंदाजाची आज्ञा पाळत रिव्ह्यू घेणे बांगलादेशी कर्णधार मोमिनुल हकला चांगलेच महागात पडले आणि संघाला रिव्ह्यू गमवावा लागला.

सोशल मीडियावरही लोक या रिव्ह्यूचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याला आतापर्यंतचा सर्वात खराब रिव्ह्यू म्हणत आहेत. या सामन्यात बांगलादेशने जबरदस्त खेळ दाखवला आहे. बांगलादेशने पहिल्या डावात न्यूझीलंडला ३२८ धावांत गुंडाळले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पाहुण्या बांगलादेश संघाने ४५८ धावा केल्या आणि १३० धावांची आघाडी घेतली.

सध्या कसोटी सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला आहे. बांगलादेशने (Bangladesh Cricket) दुसऱ्या डावात १४७ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या आणि सध्या त्यांच्याकडे १७ धावांची आघाडी आहे. या कसोटी सामन्याचा निकाल लागणे सध्या तरी शक्य वाटत असल्याने सामन्याच्या शेवटच्या दिवसाचा खेळ खूपच रंजक होणार आहे. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी ही कसोटी न्यूझीलंड कोणत्या मानसिकतेने खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Back to top button