#SAvIND : तर टीम इंडिया द. आफ्रिका दौरा रद्द करून मायदेशी परतणार - पुढारी

#SAvIND : तर टीम इंडिया द. आफ्रिका दौरा रद्द करून मायदेशी परतणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

#SAvIND : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कोरोनाचे रुग्ण वाढल्यास लगेच परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आश्वासन दिले आहे की जर देशात कोरोनाची परिस्थिती धोकादायक बनली तर भारतीय संघ दौरा रद्द करून लगेच परत मागे जाऊ शकतो.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या ट्विटर हँडलवर याची पुष्टी केली असून आगामी दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्याच्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री होणार नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही देशांच्या बोर्डांनी खेळाडूंच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

द. आफ्रिका सरकारने जर लॉकडाऊन जाहीर केला आणि देशाच्या सीमा बंद केल्या, तर अशा परिस्थितीत भारतीय संघाला तातडीने मायदेशी परतण्याची परवानगी दिली जाईल, अशी हमी सरकारने दिली आहे. दरम्यान, द. आफ्रिका सरकारने म्हटले आहे की, आम्ही आमच्या बाजूने सर्व काटेकोर व्यवस्था केली आहे. जेणेकरून भारतीय संघ येथे सुरक्षित असेल. पण जर देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला आणि जर भारतीय संघाला परत जावे लागले तर त्यांना यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 26 डिसेंबरपासून होणार आहे. ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. कारण, दक्षिण आफ्रिका हा एकमात्र असा संघ आहे ज्यांच्या देशात भारताला 29 वर्षांत कोणतीच कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

#SAvIND : कसोटी आणि वनडे मालिकेचे वेळापत्रक…

कसोटी मालिका : पहिली कसोटी : 26-30 डिसेंबर 2021 (सेंच्युरियन), दुसरी कसोटी : 3 ते 7 जानेवारी 2022 (जोहान्सबर्ग), तिसरी कसोटी : 11 ते 15 जानेवारी 2022 (केपटाऊन)

वनडे मालिका : पहिली वनडे : 19 जानेवारी 2022 (पार्ल), दुसरी वनडे : 21 जानेवारी 2022 (पार्ल), तिसरी वनडे : 23 जानेवारी 2022 (केप टाऊन)

हे ही वाचा :

 

Back to top button