Virat Kohali ICC : विराट कोहलीला ICC कडून मोठा झटका!, कारण… | पुढारी

Virat Kohali ICC : विराट कोहलीला ICC कडून मोठा झटका!, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी (ICC)ने बुधवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला मोठा फायदा झाला आहे. तो जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी इंग्लंडचा कर्णधार जो रूट हा कसोटीत नंबर वन फलंदाज होता. दुसरीकडे टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohali ICC) घसरण काही केल्या थांबेना. त्याला पुन्हा एकदा धक्का बसला असून एका स्थानाने तो खाली आला आहे. विराट सध्या ७५६ गुणांसह ७ व्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध विराट फ्लॉप ठरला..

अलीकडेच विराट कोहलीने (Virat Kohali ICC) न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर तो बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावरही त्याच्या बॅटमधून ७ डावात ३१.१४ च्या सरासरीने केवळ २१८ धावा आल्या होत्या. (Virat Kohali ICC)

विल्यमसन चौथ्या तर रोहित पाचव्या स्थानावर…

रँकिंगमधील टॉप-५ फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, लॅबुशेन आणि रूटनंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन चौथ्या आणि भारताचा रोहित शर्मा ७९७ गुणांसह ५ व्या स्थानावर आहेत. ॲशेस मालिकेत लॅबुशेनने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर त्याने प्रथमच कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. त्याने ३ डावात ७६ च्या सरासरीने २२८ धावा वसूल केल्या. याच चमकदार कामगिरीचे लॅबुशेनला ICC कडून बक्षीस मिळाले आणि तो आता जगातील नंबर एकचा कसोटी फलंदाज बनला आहे.


IND vs SA Test : विराट कोहली द. आफ्रिकेत स्वतःचा विक्रम मोडणार का?

अश्‍विन क्रमांक दोनचा गोलंदाज…

रविचंद्रन अश्विन गोलंदाजांच्या ICC कसोटी क्रमवारीत पूर्वीप्रमाणेच ८८३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनशिवाय टॉप-१० मध्ये दुसरा कोणताही भारतीय गोलंदाज नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी तिसऱ्या आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी चौथ्या स्थानावर आहे. जोश हेजलवूडचे नाव पाचव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर पहिल्या तर आर अश्विन ३६० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने तिसरा क्रमांक पटकावला. जडेजाचे ३४६ गुण आहेत.

बाबर आझम T20 मध्ये नंबर वन फलंदाज..

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला टी-२० क्रिकेटमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तो T20 क्रिकेटमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचवेळी मोहम्मद रिझवान तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा केएल राहुल पाचव्या स्थानावर कायम आहे.

Back to top button