रवींद जडेजा क्रिकेटच्‍या ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती, लवकरच करणार घोषणा

रवींद जडेजा क्रिकेटच्‍या ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती, लवकरच करणार घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा लवकरच कसोटी क्रिकेटबाबत महत्त्‍वपूर्ण निर्णय घेणार आहे. न्‍यूझीलंडविरोधातील कसोटी सामन्‍यात त्‍याला दुखापत झाली. त्‍यामुळे आता तो दक्षिण आफ्रिका दौर्‍यातूनही बाहेर पडला आहे. त्‍याला झालेली दुखापत गंभीर आहे.त्‍यामुळे तो लवकरच तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्‍याची घोषणा करेल, असे 'स्पोर्ट्स कॅफे'ने म्‍हटलं आहे.

कानपूर कसोटीत रवींद जडेजाच्‍या गुडघ्‍याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर आहे. त्‍याच्‍या गुडघ्‍यावर शस्‍त्रक्रिया झाल्‍यास त्‍याला काही महिने विश्रांती घ्‍यावी लागणार आहे. दुखापतीमुळेच तो दक्षिण आफ्रिका दौर्‍याला मुकला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्‍या एका अधिकार्‍याने दिल्‍याचे 'स्पोर्ट्स कॅफे'ने म्‍हटलं आहे.

कसोटी क्रिकेटमधून होणार निवृत्त

दुखापतीमुळे आता रवींद जडेजा हा कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त होणार आहे. मात्र तो वन डे आणि टी-20 आणि आयपीएल स्‍पर्धेत खेळेल, असे त्‍याच्‍या क्रिकेटपटू  मित्रानं म्‍हटलं आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यानंतर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरोधातील मालिका खेळणार आहे. रवींद जडेजाच्‍या गुडघ्‍यावर शस्‍त्रक्रिया झाल्‍यास तो श्रीलंका दौर्‍यालाही मुकणार आहे.

हेही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news