Hasan Ali : कोण आहे पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी? तिला म्हटलं जातंय गुप्तहेर? | पुढारी

Hasan Ali : कोण आहे पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची भारतीय पत्नी? तिला म्हटलं जातंय गुप्तहेर?

पुढारी ऑनलाईन डेस्क

टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानच्या विजयी मोहिमेला ‘ब्रेक’ लावला आणि पाकिस्तानचे टी-20 विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पाकिस्तानच्या अवाक्यात असताना सामन्याच्या १९ व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. हा सामन्याचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. त्यानंतर वेडने सलग ३ षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानी चाहते हसन अलीवर (Hasan Ali) पराभवाचे खापर फोडत आहेत. सोशल मीडिया, टीव्हीवर चाहत्यांनी हसन अलीला खलनायक ठरवलं आहे. त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे. हसन अलीसह त्याच्या पत्नीवरदेखील वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. कारण हसनची पत्नी भारतीय आहे. हा मुद्दा उपस्थित करुन हसनच्या पत्नीवर भारताची गुप्तहेर असल्याचा आरोपदेखील होत आहे. यामुळे जाणून घेऊया हसन अलीची पत्नी कोण आहे…

हसन अलीच्या (Hasan Ali) पत्नीचे नाव शामिया आरजू (Samiya Arzoo) आहे. ज्याप्रमाणे टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानकडून हारल्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीला ट्रोल केले होते त्याचप्रमाणे पाकिस्तान उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून हारल्यानंतर हसन अली आणि त्याच्या कुटुंबियातील लोकांना ट्रोल केले जात आहे. यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने जोरदार आक्षेप घेतला. पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अकरमने म्हटले आहे की, लोकांकडून अशाप्रकारच्या घाणेरड्या प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती. त्यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांतील व्यक्तींवर होणाऱ्या आक्षेपार्ह टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कोण आहे हसन अलीची पत्नी?

हसन अलीची पत्नी शामिया आरजू (Samiya Arzoo) भारतीय आहे. २० डिसेंबर २०१९ मध्ये तिने हसन अलीसोबत दुबईत एका हॉटेलात लग्न केले. या लग्न सोहळ्यावेळी दोन्हीकडील जवळचे नातेवाईक उपस्थित होते. पण शामियाने हसन अलीसोबत लग्न केले असले तरी तिचा आजही आ‍वडता खेळाडू विराट कोहली हाच आहे. ज्यावेळी शामियाने हसनशी लग्न केले होते त्यावेळी हसनची क्रिकेट कारकिर्द बहरली होती. हसनची तुलना पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अकरमशी करण्यात आली होती. २०१९ विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्याने भारतीय क्रिकेटर रोहित शर्माला लवकर आउट करण्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्षात सामन्यात रोहितने हसन अलीच्या गोलंदाजीची धुलाई केली.

हसन आणि शामियाची पहिली भेट कुठे झाली?

हसनची पत्नी शामियाने हरियाणामध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती एअर आमिरातमध्ये फ्लाइट इंजिनियर म्हणून काम करत आहे. ती हरियाणातीलल पलवल जिल्ह्यातील चांदनी गावची राहणारी आहे. तिचे वडील लियाकत अली हरियाणामधील निवृत्त खंड विकास अधिकारी आहेत. शामियाने हरियाणातील फरिदाबादमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतले. आता शामियाचे कुटुंबीय दुबईत राहतात आणि कुटुंबातील काही सदस्य दिल्लीत राहतात. शामिया आणि हसनची ओळख एका डिनरदरम्यान झाली होती.

एका वृत्तानुसार, जेव्हा शामियाने पाकिस्तान क्रिकेटर हसन अलीसोबत लग्न करण्याची इच्छा घरच्यासमोर बोलून दाखवली तेव्हा त्यांनी लग्नासाठी नकार दिला नाही. ते लग्नासाठी तयार झाले. शामिया आरजूच्या वडिलांनी एकदा म्हटले होते की, त्यांचे काही नातेवाईक शेजारील देशांत राहतात. माझे पणजोबा फाळणीवेळी पाकिस्तानात गेले. आम्ही गेल्या खूप वर्षांपासून त्यांच्या संपर्कात आहोत. आम्हाला माहीत आहे की आमचे नातेवाईक तेथे आहेत.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झाही ट्रोल…

शामियासोबत पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू शोएब मलिक यालाही पाकिस्तानी चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे. कारण शोएब मलिक याची पत्नी सानिया मिर्झा भारतीय आहे. या दोघांनाही ट्रोल केले जात आहे. टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी स्टेडियममध्ये सानिया मिर्झा दिसून आली होती.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Hassan Ali (@ha55an_ali)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hassan Ali (@ha55an_ali)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hassan Ali (@ha55an_ali)

Back to top button