India vs Canada सामन्‍यावर पावसाचे ढग! हवामान अंदाज काय सांगतो? | पुढारी

India vs Canada सामन्‍यावर पावसाचे ढग! हवामान अंदाज काय सांगतो?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत आज (दि.१५)  भारत आणि कॅनडा ( India vs Canada) यांच्‍यातील अ गटातील सामना होणार आहे. भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8मध्‍ये दिमाखात प्रवेश केला आहे. प्‍लोरोडा येथे ोणार्‍या या सामन्‍यावर पावसाचे ढग आहे. (ICC Men’s T20 World Cup) जाणून घेवूया आज फ्‍लोरोडामधील हवामानाविषयी…

कॅनडाविरद्‍धचा सामना बलाढ्य भारतीय क्रिकेट संघासाठी सराव सामनाच असणार आहे. मात्र आज कर्णधार रोहित शर्मा कोणते बदल करणार हे पाहावे लागणार आहे. फिरीकपटू कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल या दोघांनाही संधी मिळण्‍याची शक्‍यता आहे. असे झाल्‍यास रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना विश्रांती घ्‍यावी लागेल. अक्षर पटेल याने विश्‍वचषक स्‍पर्धेत गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे.

India vs Canada : आज कसे असेल फ्‍लोरिडामधील हवामान?

आज (दि.१५) फ्लोरिडामध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. शहरात पावसाचा रेड अर्लटही देण्‍यात आला आहे. हवामानात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्‍याचे हवामान खात्‍याने म्‍हटलं आहे. शहरात आज दिवसभर पावसाची 50 टक्के शक्यता आहे, तर सामना सुरू झाल्यानंतर अर्धा तास पाऊस पडण्याचा अंदाज 51 टक्के आहे. हवामान खात्‍याचा अंदाज बरोबर ठरला तर भारत आणि कॅनडा यांच्यात सामना होण्‍याची शक्‍यता फारच कमी आहे.

भारतीय संघाचे सराव सत्र रद्द

भारतीय संघाचे फ्लोरिडामध्ये १४ जून रोजी होणारे सराव सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले आहे. लॉडरहिल, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथे या आठवड्याच्या उर्वरित भागात मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. लॉडरहिलमध्ये ड्रेनेजची विशेष सुविधा नसल्यामुळे मैदान कोरडे करण्यासाठी मैदानधारकांना कसरत करावी लागणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button