‘ऑरेंज कॅप घातली म्‍हणून IPL जिंकणार नाही’: रायुडूने पुन्हा उडवली विराटची खिल्‍ली

‘ऑरेंज कॅप घातली म्‍हणून IPL जिंकणार नाही’: रायुडूने पुन्हा उडवली विराटची खिल्‍ली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) स्‍पर्धेच्‍या विजेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने 10 वर्षांनंतर आपली मोहर उमटवली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज अंबाती रायुडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीची पुन्‍हा एकदा खिल्ली उडवली आहे. आयपीएल 2024 मधून बाहेर पडल्यापासून बंगळुरू फ्रँचायझीवर टीका करत असलेल्या रायडूने पुन्हा एकदा विराट काेहलीवर निशाणा साधला आहे.

काय म्‍हणाला अंबाती रायुडू?

आयपीएल अंतिम सामन्‍यानंतर बोलताना अंबाती रायुडू म्‍हणाला की, "नरेन, रसेल आणि स्टार्कसारख्या दिग्गज क्रिकेटपटूच्‍या कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने संघाचा विजय झाला. संघाचे अभिनंदन. या तिघांनीही संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. अशा प्रकारे एखादा संघ आयपीएल जिंकतो. हे आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकल्याने तुम्हाला चॅम्पियन बनवता येत नाही, परंतु त्यासाठी प्रत्येक खेळाडूला 300-300 धावा कराव्या लागतात."

विराटला दिला सल्‍ला

'विराट कोहली संघातील एक दिग्गज आहे. तो इतका उच्च मापदंड ठेवतो की तरुणांवर त्याचे अनुकरण करण्याचा दबाव येतो. त्यामुळे युवा खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये चांगल्या स्थितीत राहता यावे यासाठी विराटला आपली पातळी थोडी कमी करावी लागेल, असा सल्‍लाही त्‍याने दिला.

यापूर्वी 'आरसीबी' संघ व्‍यवस्‍थापनावर केली होती टीका

काही दिवसांपूर्वी रायुडूने आरसीबीच्या खराब व्यवस्थापनावर टीका केली होती की, ते सांघिक विजेतेपदांपेक्षा वैयक्तिक कामगिरीला प्राधान्य देतात. रायुडूने आवर्जून सांगितले की, अशा प्रकारच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनामुळेच आरसीबीने १७ हंगामात एकही विजेतेपद जिंकलेले नाही. रायुडू म्हणाला होता की, आरसीबीच्या सर्व चाहत्‍यांनी अनेक वर्षांपासून संघाला आपले प्रेम दिले आहे. संघ व्यवस्थापनाने वैयक्तिक कामगिरी करण्यापूर्वी संघांचे हित पाहिले असते तर आरसीबीने आतापर्यंत अनेक विजेतेपदे जिंकली असती. वैयक्तिक यशापेक्षा संघांच्या हितसंबंधांना प्राधान्य देणारे खेळाडू आणण्यासाठी तुमच्या व्यवस्थापनाला सक्ती करा, असा सल्‍लाही त्‍याने दिला होता.

केवळ उत्‍साह आणि सेलिब्रेशनवर ट्रॉफी जिंकता येत नाही

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर, रायुडूने फ्रँचायझीला ट्रोल करत म्‍हटलं होतं की, तुम्ही आरसीबीबद्दल बोललात, तर यावरून दिसून येते की, संघ केवळ उत्‍साह आणि सेलिब्रेशनवर ट्रॉफी जिंकता येत नाही. केवळ प्लेऑफमध्ये पोहोचून तुम्हाला आयपीएल ट्रॉफी मिळत नाही. CSK ला हरवून तुम्ही ट्रॉफी जिंकाल असे समजू नका. नंतर, रायुडू याने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर करत आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांना आठवण करून दिली होती की, चेन्‍नईने आयपीएलमध्ये पाच विजेतेपद जिंकले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news