IPL 2024 : ‘KKR’च्या विजयानंतर शाहरुख खूश; गंभीरचे केलं कौतुक (व्हिडिओ) | पुढारी

IPL 2024 : 'KKR'च्या विजयानंतर शाहरुख खूश; गंभीरचे केलं कौतुक (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीगचे तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. केकेआर हा आयपीएलमध्ये तिसरा सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ बनला आहे. या विजयानंतर संघाचा मालक शाहरुख खान खूपच खूश दिसत होता. संघाचे अभिनंदन करण्यासाठी तो मैदानात आला होता. केकेआरच्या सेलिब्रेशनमधील शाहरूख आणि गंभीरचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शाहरुखनं गंभीरला केलं किस

केकेआरने सनरायझर्स हैदराबादला ११३ धावांत गुंडाळल्यानंतर एकतर्फी विजय मिळवून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. खेळाडूंनी या विजयाचे श्रेय गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना दिले आहे. सामना संपल्यानंतर शाहरुख खान मैदानात आला आणि त्याने गौतम गंभीर याला किस केले. यानंतर त्याने कर्णधार श्रेयस अय्यरलाही मिठी मारली. या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सनरायझर्सच्या पराभवानंतर काव्या मारन रडल्या

सामना संपल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन काव्या मारनला तिचे अश्रू लपवता आले नाहीत. कॅमेऱ्याच्या दुसऱ्या बाजूला डोकं वळवून ती अश्रू पुसताना दिसली. यानंतर तिने प्रेक्षकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि केकेआर संघाचे अभिनंदनही करताना ती दिसली. सामन्यानंतरच्या तिच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामन्यात काय घडलं?

‘आयपीएल २०२४’च्या फायनलमध्ये ‘केकेआर’ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटस् आणि तब्बल ५७ चेडू राखून सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सनरायझर्सच्या अंगलट आला. स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला होता. केकेआरच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला १८.३ षटकात ११३ धावांवर रोखले होते. केकेआरने १०.३ षटकातच २ बाद ११४ धावा करून सामना जिंकला.

हेही वाचा : 

Back to top button