IPL 2024 Final : ‘शाहरुख खानने म्हटल्याप्रमाणे…’; कोलकाता संघाला दिग्‍गजांकडून शुभेच्‍छा | पुढारी

IPL 2024 Final : ‘शाहरुख खानने म्हटल्याप्रमाणे…’; कोलकाता संघाला दिग्‍गजांकडून शुभेच्‍छा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) स्‍पर्धेच्‍या विजेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने 10 वर्षांनंतर आपली मोहर उमटवली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.. याआधी केकेआरने 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. रविवार, २६ मे रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2024 फायनलमध्ये, KKR ने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करून ट्रॉफी जिंकली. केकेआर चॅम्पियन होताच दिग्गजांनी  संघाला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. तर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शाहरुख खानच्‍या डाॅयलाॅगचे स्‍मरण करत फिल्मी स्‍टाईलमध्‍ये कोलकाता संघाचे अभिनंदन केले आहे.

यंदाच्‍या आयपीएल अंतिम सामन्‍यात कोलकाताच्‍या गोलंदाजांनी हैदराबादचा डाव ११३ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने अवघ्या 10.3 षटकांत लक्ष्य गाठून आयपीएल चषकावर आपली माेहर उमटवली. केकेआरला सोशल मीडियावर अनेक क्रिकेटपटूंनी टीमला खास शुभेच्छा दिल्या.

सचिन तेंडलुकरने केले केकेआरचे अभिनंदन

सचिन तेंडुलकर याने आपल्या X ट्विटमध्ये म्‍हटलं आहे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या फलंदाजांनी स्‍पर्धेच्‍या सुरुवातीपासून धमाकेदार कामगिरी केली होती; परंतु स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गोलंदाजांनी प्रभावी कामगिरीचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीत त्याच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. झटपट विकेट्स घेत फलंदाजांना सोपे आव्‍हान दिले. आयपीएल ट्रॉफी तिसर्‍यांदा जिंकल्याबद्दल सर्व खेळाडूंचे आणि कोचिंग स्टाफचे अभिनंदन. सचिनने आपल्या ट्विटमध्ये गौतम गंभीर आणि शाहरुख खानला टॅग केले आहे.

वीरेंद्र सेहवागने केकेआरचे केले फिल्‍मी स्‍टाईलने अभिनंदन

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने फिल्मी स्‍टाईलमध्‍ये कोलकाता संघाचे अभिनंदन केले आहे. सेहवागने X वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, “तिसरे विजेतेपद जिंकल्याबद्दल केकेआरचे अभिनंदन. शाहरुख खानने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर संपूर्ण विश्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याचे विशेष श्रेय श्रेयस अय्यरला जाते, ज्याने शानदार कर्णधार केले. कर्णधारपदच नाही, तर क्षेत्ररक्षण आणि त्याचे मनसुबे सगळेच यशस्वी ठरले. आधी नेहरा आणि आता गौतम गंभीर हे मार्गदर्शक बनले आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली हे पाहून बरे वाटले. छान टीम.”

युवराज सिंग काय म्हणाला?

युवराज सिंगने त्याच्या एक्सवर लिहिले की, आयपीएलच्या १७व्या सीझनचा चॅम्पियन बनल्याबद्दल केकेआरचे अभिनंदन. संपूर्ण मोसमात केकेआरची कामगिरी अप्रतिम होती. हैदराबाद संघानेही चमकदार कामगिरी केली, मात्र आज ज्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली तोच संघ विजेता ठरला. गौतम गंभीरचे खास अभिनंदन. कोणतीही भीती न बाळगता अप्रतिम मार्गदर्शन करणाऱ्या आणि सर्वांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुख खानने आज सिनेमा आणि क्रिकेट दोन्ही जिंकले.

हेही वाचा : 

 

Back to top button