KKR vs RCB : कोलकाताचे बंगळुरूला 223 धावांचे लक्ष्य

KKR vs RCB : कोलकाताचे बंगळुरूला 223 धावांचे लक्ष्य

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि फिल सॉल्ट आणि रमणदीप सिंग यांच्या वेगवान खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने बंगळुरूसमोर 223 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (KKR vs RCB)

फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामीच्या जोडीने केकेआरला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 26 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. सॉल्टने लॉकी फर्ग्युसनच्या षटकातून 28 धावा केल्या, मात्र मोहम्मद सिराजने सॉल्टला बाद करून अर्धशतक झळकावण्यापासून रोखले. यानंतर केकेआरचा डाव फसला आणि संघाने 97 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले, मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर तोही बाद झाला.

सरतेशेवटी, रमणदीप सिंगने वेगवान खेळी खेळल्यामुळे कोलकातने बंगळुरूला 223 धावांचे लक्ष्य दिले. रमणदीपने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 24 धावा केल्या. आंद्रे रसेलने दुसऱ्या टोकाकडून रमणदीपला चांगली साथ दिली आणि रसेल 20 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 27 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.3

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news