राहुल गांधींची तब्येत बिघडली, रांचीमधील ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याला मुकणार | पुढारी

राहुल गांधींची तब्येत बिघडली, रांचीमधील 'इंडिया' आघाडीच्या मेळाव्याला मुकणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रांची येथील इंडिया ब्लॉक मेळाव्याला मुकणार आहेत. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्‍या माध्‍यमातून आज (दि.२१) दिली.
आपल्‍या पोस्‍टमध्‍ये जयराम रमेश यांनी म्‍हटलं आहे की, राहुल गांधी सतना येथे प्रचाराला संबोधित करण्यासाठी आणि रांची येथे इंडिया आघाडीच्‍या रॅलीला उपस्थित राहण्यासाठी तयार होते; परंतु ते अचानक आजारी पडले. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे झारखंडच्या राजधानीत विरोधी आघाडीच्या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव यांच्यासह भारतीय गटाचे अनेक नेते रांची येथील ‘उलगुलन (विद्रोह) न्याय’ रॅलीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी होणार आहेत. रांचीच्या प्रभात तारा मैदानात सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान संयुक्त शक्ती प्रदर्शन म्हणून झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने आयोजित केली आहे.

श्री राहुल गांधी आज सतना और रांची में चुनाव प्रचार के लिए पूरी तरह से तैयार थे, जहां INDIA की रैली हो रही है। लेकिन वह अचानक बीमार हो गए हैं और फिलहाल नई दिल्ली से बाहर नहीं जा सकते हैं। कांग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे जी अवश्य सतना में जनसभा को संबोधित करने के बाद रांची…— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 21, 2024

Back to top button