Rohit Sharma News : एड शीरनने गायले रोहित शर्माच्या मुलीसाठी खास गाणे (व्हिडिओ व्हायरल) | पुढारी

Rohit Sharma News : एड शीरनने गायले रोहित शर्माच्या मुलीसाठी खास गाणे (व्हिडिओ व्हायरल)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सध्या आयपीएलचे वारे जोरात वाहत आहे. स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसे स्पर्धेतील सामने रोमांचक होत आहेत. दरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा यूट्यूब चॅट शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’च्या सीझन प्रीमियरमध्ये खास पाहुणे आला होता. यावेळी स्पेशल एपिसोडमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायराही त्याच्यासोबत होत्या. शोला द्विगुणित करण्यासाठी प्रसिद्ध गायक एड शीरनलाही बोलावण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात एड शीरनने रोहितची मुलगी समायरासाठी गाणे म्हटले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Rohit Sharma News)

शो दरम्यान शीरानने समायरासाठी एक गाणे गायले. यावेळी शीरानने त्याच्या ‘Bad Habits’ या सुपरहिट गाण्याच्या काही ओळी गायल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान समायरा आणि रितिकाशिवाय रोहित आणि गौरवने ही साथ देताना दिसत आहेत.

रोहित सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याकडे मुंबईच कर्णधार पद सोपवण्यात आले होते. रोहितने गुरुवारी बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात 24 चेंडूत 38 धावा करत मुंबईच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली होती. आयपीएलनंतर रोहित वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (Rohit Sharma News)

चॅट शो दरम्यान रोहितने त्याच्या भविष्याबद्दल मोकळेपणाने सांगितले की, क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नाही. भारताला T20 विश्वचषक जिंकून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्याने सांगितले. तसेच पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये खेळण्याचा विचार करत आहे.

पुढे तो म्हणाला की, मी निवृत्तीचा विचार केलेला नाही. मात्र, आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाते हे कोणालाच माहीत नाही. मी सध्या चांगला खेळत आहे. त्यामुळे मला वाटते की मी आणखी काही वर्षे खेळत राहीन आणि त्यानंतर पुढे काय होईल हे मला माहीत नाही. मला 2025 मध्ये विश्वचषक आणि WTC फायनल जिंकायची आहे. भारत जिंकेल अशी आशा आहे.

हेही वाचा :

Back to top button